मा.खा.लोखंडे यांचा संवेदनशीलपणा;मुख्यमंत्री सहायता निधीला तीन महिन्यांची पेन्शन सुपुर्द

श्रीरामपूर-शिर्डीचे मा.खा.सदाशिव लोखंडे यांनी मा.आमदार व खासदार म्हणून त्यांना मिळत असलेली ३ महिन्यांची पेन्शन रक्कम ३,१५,००० रुपये (तीन लक्ष पंधरा हजार...

श्रीरामपूर-
शिर्डीचे मा.खा.सदाशिव लोखंडे यांनी मा.आमदार व खासदार म्हणून त्यांना मिळत असलेली ३ महिन्यांची पेन्शन रक्कम ३,१५,००० रुपये (तीन लक्ष पंधरा हजार रु.) धनादेशद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकक्षाकडे सुपूर्द केली आहे.नुकताच लोखंडे यांनी सदर रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करत आपली मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. यानिमित्ताने लोखंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून शेती,शेतकरी व सर्वसामान्य पुर्णतः उध्वस्त झाला आहे.जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांच्या हाती पीक राहिलेले नाही.संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे व इतर अनेक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
अशा अडचणीच्या परिस्थितीत आपली जबाबदारी ओळखून शिर्डीचे माझी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपली तीन महिन्याची पेन्शन पुरग्रस्तासाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली असून मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने योग्य निर्नय घेतलेले आहेत.तसेच जाहीर झालेली मदत सर्वदूर पोहचावी अशी विनंतीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली.

मा. खा. सदाशिव लोखंडे यांनी मदतीच्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!