श्रीरामपूरातील आरोग्य अधिकारी केले ‘टार्गेट’;ब्लॅकमेल करून पैसे उकळणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-माहितीच्या अधिकाराचा वापर करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहिती मागवून घेऊन तेथील डॉक्टरलाच ब्लॅकमेल करत पैसे उकळणाऱ्याच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा...

श्रीरामपूर-
माहितीच्या अधिकाराचा वापर करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहिती मागवून घेऊन तेथील डॉक्टरलाच ब्लॅकमेल करत पैसे उकळणाऱ्याच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील एजाज कलींदर पठाण, वय-२७,रा.वॉर्ड नं.१,आर.बी.एन.बी. कॉलेजजवळ असे आरोपीचे नाव आहे.याबाबत डॉक्टर रामदास बाबासाहेब बोरूडे, वय ४०, रा. बेलापूर रोड, वॉर्ड नं.७,बोंबलेनगर, हल्ली नोकरी टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्रीरामपूर शहरातील पठाणवस्ती, वॉर्ड नं.१, आर.बी.एन.बी. कॉलेजच्या पाठीमागे राहणारा एजाज कलींदर पठाण, वय-२७
याने टाकळीभानच्या आरोग्य केंद्रात येवून मी छावा ब्रिगेडचा अध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख आरटीआय कार्यकर्ता असल्याचे सांगत माहिती अधिकाराच्या अर्जाद्वारे रूग्णालयातील बिले, कॅशबुक, बँक स्टेटमेंट यांच्या प्रती मागवल्या. त्यांना आपण सदरची माहिती पुरवली. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत जमिला पठाण, त्याचा प्रतिनिधी विनायक जाधव यांच्या नावाने एकूण ७ अर्ज दिले. तसेच विविध मुद्देनिहाय माहिती मागवली. आमच्यासह तालुक्यातील पढेगाव, बेलापूर,
माळवाडगाव व श्रीरामपूर नगरपरिषद आरोग्य केंद्र श्रीरामपूर यांनाही माहिती मागितल्याचे डॉक्टरांकडून मला समजले. माहिती देण्याची प्रक्रिया चालू असताना एजाज पठाण याने आपल्याला फोन करून प्रकरण मिटवण्यासाठी ३० हजार रुपये मागितले. आपण घाबरून २२ हजार रूपये त्याला पाठवले. त्यानंतर एजाज पठाण व विलास ढोकणे नावाने मला तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर ९ वैद्यकीय अधिकारी,अकौंटंट यांच्याविरूद्ध मंत्रालय व इतर १२ ठिकाणी लेखी तक्रार अर्ज केले. त्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी आमचा खुलासाही घेतला. त्यात आमचा दोष नसल्याचे सांगितले. त्यानंतर पठाण याने माझ्या व इतर ३ वैद्यकीय अधिकाऱ्यांविरूद्ध वरीष्ठ कार्यालयात अर्ज सादर केला. त्यानंतर एजाज पठाण याने आपल्या मोबाईलवर फोन करून प्रकरण मिटवायला बोलावले. तेथे १ लाखाची मागणी केली व सगळ्या डॉक्टरांना बोलवा, बैठक घ्या, किती द्यायचे ते ठरवा, नाहीतर सर्व डॉक्टरांवर गुन्हे दाखल होतील, तुम्हाला जेलमध्ये बसावे लागेल, अशी धमकी दिली. अशाच प्रकारे पढेगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांना देखील धमकी दिल्याचे आपल्याला समजले असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर फिर्यादीवरून पोलिसानी एजाज कलींदर पठाण याच्याविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि.नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!