‘ड्राय- डे’लाच श्रीरामपुरात देशी-विदेशी दारू पकडली;२ लाख ४४ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर-राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ ने शहरातील भगतसिंग चौकाजवळील घास गल्लीतील वाईन सेंटर या दारूच्या दुकानाजवळ देशी-विदेशी दारूसह तिघांना ताब्यात...

श्रीरामपूर-
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.२ ने शहरातील भगतसिंग चौकाजवळील घास गल्लीतील वाईन सेंटर या दारूच्या दुकानाजवळ देशी-विदेशी दारूसह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४४ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विशेष म्हणजे कारवाई करण्यात आलेल्या दोन दारूच्या दुकांनांपैकी एक दारूचे दुकान हे माजी नगरसेवकाच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे.महात्मा गांधी जयंती व विजयादशमीमुळे सगळीकडे  ड्राय डे आहे. मात्र अनेक ठिकाणी लपून-छपून दारूची विक्री सुरू आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील घासगल्ली येथील वाईन सेंटर या दारूच्या दुकानाजवळ देशी व विदेशी दारू विकताना तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ देशी दारूचे १४ बॉक्स, विदेशी दारूचे २ बॉक्स, बिअर २ बॉक्स व टाटा मॅजिक टेम्पो असा सुमारे २ लाख ४४ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दारू उत्पादन शुल्क चे निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर, जवान सचिन बटुळे, यु. डी. काळे, महिला जवान आर. ए. काळा पहाड व चालक दुर्गेश गायकवाड यांनी केली. यामध्ये  किशोर भुक्तर, अनिल  भुक्तर,अक्षय काळे या तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!