महावितरणच्या बेलापूर उपविभागास राज्य सरकारची मंजुरी;आ.हेमंत ओगले यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-आमदार हेमंत ओगले यांच्या प्रयत्नाला यश आले असून महावितरणाच्या श्रीरामपूर ग्रामीण कार्यालयाचे विभाजन होऊन नव्याने बेलापूर ग्रामीण उपविभाग निर्माण करण्यास राज्य...

श्रीरामपूर-
आमदार हेमंत ओगले यांच्या प्रयत्नाला यश आले असून महावितरणाच्या श्रीरामपूर ग्रामीण कार्यालयाचे विभाजन होऊन नव्याने बेलापूर ग्रामीण उपविभाग निर्माण करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार होताच आ.ओगले यांनी श्रीरामपूर महावितरण कार्यालयाचे विभाजन करावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे वेळोवेळी समक्ष भेटी घेऊन महावितरण कार्यालयाचे विभाजन करणे करिता प्रयत्न केले होते.सदर प्रयत्नास यश आले आहे.श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघ हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असून महावितरणाच्या श्रीरामपूर कार्यालयावर अधिकचा भार येत होता त्याचा परिणाम विशेषता ग्रामीण भागासह औद्योगिक विकासावर  होत होता. हीच बाब लक्षात घेऊन आमदार ओगले यांनी श्रीरामपूर महावितरण कार्यालयाच्या विभागणीची मागणी शासन दरबारी केली होती. नव्याने झालेल्या बेलापूर ग्रामीण उपविभाग कार्यालयाला 12 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली असून त्याच्या वित्तीय खर्चास देखील शासनाने मान्यता दिली आहे.आता श्रीरामपूर ग्रामीण उपविभागाच्या आस्थापनेवर श्रीरामपूर एमआयडीसी शाखा, श्रीरामपूर ग्रामीण शाखा, व सूतगिरणी शाखा आणि नव्याने मंजूर झालेल्या बेलापूर ग्रामीण उपविभागाच्या आस्थापनेवर बेलापूर ग्रामीण शाखा, हरेगाव ग्रामीण शाखा आणि टाकळीभान ग्रामीण शाखा आशा कार्यालय ठेवण्यात आले आहे. या कार्यालयाच्या विभाजनामुळे मतदारसंघातील शेतकरी व ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे देखील आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले आहे.

आ.ओगले यांच्या पाठपुराव्यातून विजेच्या बाबतीत मतदारसंघ स्वयंपूर्ण होणार असून गेल्या काही दिवसांपूर्वीच 220 के.व्ही सब स्टेशनच्या कामाच्या शुभारंभ होऊन कामास देखील प्रारंभ झाला आहे तसेच आता श्रीरामपूर वीज केंद्राचे विभाजन होऊन नव्याने बेलापूर उपकेंद्रास मंजुरी मिळाल्याने याचा विज ग्राहकांना फायदा होणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!