पाच तलवारीसह एकाला ठोकल्या बेड्या;श्रीरामपुर शहर पोलीसांची कामगिरी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 येथे श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका जणाला पाच तलवारिंसह बेड्या ठोकल्या आहेत.कालच 3 गावठी कट्टे आणि 4...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 येथे श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका जणाला पाच तलवारिंसह बेड्या ठोकल्या आहेत.कालच 3 गावठी कट्टे आणि 4 आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर आज पुन्हा एका आरोपीला तलवारिंसह पोलिसांनी अटक केल्याने श्रीरामपूरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे. दरम्यान आरोपी गुलाबनबी अन्वर शेख याच्या विरोधात पोलिसांनी
श्रीरामपुर शहर ठाणे येथे गु.र.क्र 881/2025 आर्म अँक्ट कलम 4,7,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
दि.25/09/2025 रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे त्यांनी पोलीस पथक पंचासह काजीबाबा दर्गाच्या पाठीमागे वार्ड नं 02 श्रीरामपुर येथे पाठवले. तेथे आरोपी गुलाबनबी अन्वर शेख .रा. काझीबाबा दर्गाच्या पाठीमागे वॉर्ड नं. 02, श्रीरामपूर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी केली असता त्याने बेकायदा असलेल्या व आजोबाच्या घरामध्ये लपवुन ठेवलेल्या  3 हजार रु.किंमतीच्या पाच तलवारी पंचासमक्ष पोलिसांना काढुन दिल्या. त्या पोलीसांनी ताब्यात घेतल्या.तसेच आरोपीत इसम यास पोलीस ठाणे येथे आणुन त्याच्याविरुध्द श्रीरामपुर शहर ठाणे येथे आर्म अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचेकडील पथकातील पोसई/समाधान सोळंके, स.पो.उपनिरीक्षक सुर्यवंशी, पो.ह.साळवे. पोना/संदीप दरंदले, पोकों/संभाजी खरात, पो. काँ/कातखडे, पो.काँ/पटारे, पो.काँ /वाघमारे. पो. काँ/शिंदे, पो.काँ / दुकळे. पो. काँ गिरी, म.पो. काँ / मुसमाडे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस पो.हे. काँ राजेंद्र त्रिभुवन हे करीत आहेत.

श्रीरामपूर शहर पोलिसांनी एका जणाला पाच तलवारिंसह बेड्या ठोकल्या आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!