चेंडूफळ येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस जळून खाक;शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

श्रीरामपूर-श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील चेंडूफळ (ता. वैजापूर) गावात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील चेंडूफळ (ता. वैजापूर) गावात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे  तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.या शेतकऱ्यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.भारत भागवत पवार, अभय लक्ष्मीकांत पवार, राजेंद्र विजय पवार अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.या शेतकऱ्यांच्या शेतात महावितरणचे वीजवाहक पोल असून त्यावरील तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ऊस पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय,वैजापूर यांच्याकडे याबाबत वेळोवेळी तक्रार देखील केली होती असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.महावितरणकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली नसल्याचाही या शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे ऊस जळीताची ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाच त्यात या ऊस पिकाच्या जळीताच्या घटनेने या शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी मदतीसाठी अग्निशामक वाहनासही बोलवले होते परंतु वैजापूर तालुक्यापासून 45 किलोमीटर अंतर असल्यामुळे ती मदतही वेळेत होऊ शकली नाही.ऊस पिकाचे जळीत होऊन झालेल्या नुकसानीला महावीतरणाचा भोंगळ कारभार जबाबदार असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!