शेती व घरगुती वीज पुरवठा अखंडितपणे करा;शिवसेनेचे महावितरणला निवेदन

श्रीरामपूर-तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात गेल्या महिन्यापासून वीज पुरवठा वांरवार खंडित होत आहे. थोडासा पाऊस झाला तरी वीज पुरवठा खंडित होतो....

श्रीरामपूर-
तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात गेल्या महिन्यापासून वीज पुरवठा वांरवार खंडित होत आहे. थोडासा पाऊस झाला तरी वीज पुरवठा खंडित होतो. ग्रामीण व शहरी भागतील शेती व घरगुती वापरातील वीज पुरवठा अखंडितपणे सुरळीत करावा, याकरिता लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी खा. सदाशिव लोखंडे व माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शिवसेनेच्यावतीने महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गेल्या महिन्यापासून अनेक वेळा सकाळी व सायंकाळी दोन तास वीज पुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तात्काळ शहरी व ग्रामीण भागातील शेती व घरगुती वापरातील वीज पुरवठा अखंडितपणे सुरळीत करावे.या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार होऊन महावितरण कंपनीने त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा याप्रश्नी लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी खा. सदाशिव लोखंडे व माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.निवेदन देताना मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रदिप वाघ, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, अशोक कारखान्याचे संचालक निरज मुरकुटे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, तालुका प्रमुख उमेश पवार, नाना पाटील, विशाल धनवटे, गणेश छल्लारे, राहुल भंडारी, विक्रम नाईक, कैलास भागवत, चांगदेव जाधव, अशोक जाधव, अंश शिरसाळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

श्रीरामपूर शिवसेनेच्यावतीने महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता अजय भंगाळे यांना निवेदन देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!