शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा ; आ.हेमंत ओगले यांच्या तहसीलदारांना सूचना

श्रीरामपूर-श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश श्रीरामपूर व राहुरी तहसीलदारांना दिले असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे.
श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टी तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे त्यामध्ये शेती पिकासह काही ठिकाणी राहत्या घरांची देखील नुकसान झाले आहे सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले असून सदरचे पंचनामे होताच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले.श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना राहुरी व श्रीरामपूर येथील तहसीलदारांना दिल्या आहेत. याबाबत काही अडचण आल्यास मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आ. ओगले यांनी केले आहे.

दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे श्रीरामपूर शहरात देखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते पालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या नालेसफाईवर आमदार हेमंत ओगले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना तातडीने नालेसफाई करण्याचे आदेश देताच पालिकेने सफाई चे काम चालू केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!