‘अशोकलाच ऊस द्या’ म्हणण्याची वेळ तुमच्यावर का आली?;शेतकरी संघटनेचे भोसले यांचा सवाल

श्रीरामपूर-गेली चाळीस वर्षे अशोक कारखाना ताब्यात असणाऱ्या माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी कारखाना आर्थिक डबघाईस आणला.आजमितीला कारखान्यावर ४५० कोटीचे कर्ज करुन ठेवले...

श्रीरामपूर-
गेली चाळीस वर्षे अशोक कारखाना ताब्यात असणाऱ्या माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी कारखाना आर्थिक डबघाईस आणला.आजमितीला कारखान्यावर ४५० कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे.सातत्याने कमी भाव मिळत असल्याने सभासद,ऊसउत्पादक अशोक कारखान्याकडे पाठ फिरवू  लागले आहेत.आज ‘अशोकलाच ऊस द्या’ असे म्हणण्याची वेळ तुमच्यावर का आली? याचे आत्मपरिक्षण करा,असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेन्द्र भोसले यांनी केले आहे.प्रसिध्दीस दिलेल्या पञकात श्री.भोसले यांनी माजी.आ.मुरकुटे यांच्या अशोक कारखान्याला ऊस देवून कामधेनु वाचवावी या आवाहनाची खिल्ली उडविली.ते पुढे म्हणाले की, अशोक कारखान्याच्या व्यवस्थापनाने गणेश कारखान्याचा आदर्श घेवून मागील हंगामाचे प्रतिटन ३०० रुपये व सन २३-२४ हंगामाचे २०० रु. असे ५०० रुपये पेमेंट दस-यापूर्वी अदा करावे.कामगार हे सभासद अथवा सभासदांची मुले आहेत तेव्हा  कामगार व निवृत्त कामगारांचे थकीत देणे अदा करावे.कामगारांच्या नावावर घेतलेले कर्ज निल करावे.अन्यथा दस-यानंतर सभासद व कामगारांच्या पोटातील आग मस्तकात गेल्यास नेपाळमध्ये झाली तशी परिस्थिती कारखान्यावर होईल असा इशाराही श्री.भोसले यांनी दिला आहे.सभासद ऊस ऊत्पादकांना गणेश कारखान्यापेक्षाही कमी भाव घ्यावा लागतो आहे.कामगारांना आठ महिन्यांचे वेतन, निवृत्त कामगारांच्या ग्रॅज्युइटीच्या रकमाही थकीत आहेत.कामगारांच्या नावावर कर्ज काढून कारखाण्याचा खर्च भागविण्याची वेळ आली.या सर्व स्थितीमुळे अशोकरुपी कामधेनुची माजी आ.मुरकुटे यांनी खाटी गाय केली आहे.सी.ए.चेअरमन व सर्वेसर्वा असलेला अशोक कारखाना गणेश इतकाही भाव देत नाही.गणेश कारखान्याने १९८८पासूनचे कामगारांचे देणे चुकते केले. तर “अशोक”च्या व्यवस्थापनाने कामगारांचे वेतन थकविले.२५ टक्के पगार कपात सुरु केली.कोट्यावधीचे ऊस तोडणी मजूर, वाहतुकदार,व्यापारी देणेही थकविले.अनावश्यक गाळप,डिस्टीलरी,इथेनाॕल प्रकल्पांची क्षमतावाढ  करुन कारखाना ४५० कोटी इतका कर्जबाजारी करुन ठेवला.आता परत ९०० टनाची गाळप क्षमतावाढ प्रस्तावित केली आहे.गेली ३० वर्षे विखे – थोरातांना शिव्या देऊन सभासदांच्या डोळ्यात धूळफेक केली. दारुचे कारखानदार जास्त दर देऊ शकतात मग आपल्याकडेही देशी दारू वगळता सर्व प्रकल्प आहेत. मग कबूल करूनही भाव का देऊ शकत नाही याचे उत्तर मुरकुटे यांनी दिले पाहिजे. प्रकल्पासाठी व विस्तारीकरणासाठी कपात केली नाही असे म्हणता मग ३००/४०० रुपये भाव कमी देऊन अप्रत्यक्षपणे ऊस बिलातुन कपात केली नाही का? शैक्षणिक संस्थांसाठी सभासदांकडून एक रुपयाही घेतला नाही म्हणणाऱ्या मुरकुटे यांनी सभासदांच्या ऊस बिलातून कपात केलेल्या भागविकास निधीचे काय केले? या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे.सध्या माजी.आ.मुरकुटे यांनी गावोगावी जाऊन जलपूजन करण्याचा धडाका लावला आहे.यात केवळ नातवाला प्रोजेक्ट करायचा हेतू आहे.श्री.मुरकुटे गेली २५ वर्षे आमदार नाहित.तरी पाटपाण्याची अडचण भासली नाही.यावरुन श्री.मुरकुटे यांनी पाटपाण्याचा केवळ राजकीय बागूलबुवा उभा केला होता हे सिध्द होते.स्व.गोविंदराव आदिक पाटबंधारे मंञी असताना खानापूर व भेर्डापूरचे के.टी.वेअर झाले.त्यानंतर स्व.दौलतराव पवारांनी पाणी प्रश्न धसास लावला.भांडारदराचे पाणी वाटप करुन तालुक्याला ५२ टक्के शाश्वत पाणी मिळवून दिले.ज्या स्व.जयंत ससाणे यांच्या आमदारकीच्या काळात समन्यायी पाणी वाटपाचा काळा कायदा झाला असे म्हणत श्री.मुरकुटे खडे फोडायचे त्यांच्या गटाशीच सत्तेसाठी नंतर हातमिळवणी केली.ज्या माजी आ.भाऊसाहेब कांंबळे यांच्या काळात ब्लाॕक रद्द झाले.त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता बसत आहेत.अन्याय सहन करणाऱ्या सभासद, ऊसउत्पादक व कामगारांनी आता अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही श्री. भोसले यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!