बेलापूर येथील वादग्रस्त बेकरीचे शेड टवले; पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाई

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : बेलापूर येथील उर्दू शाळेजवळ गोमांस विक्रीसाठी वापरले जात असलेले वादग्रस्त शेड अखेर बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात हटवले...

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : बेलापूर येथील उर्दू शाळेजवळ गोमांस विक्रीसाठी वापरले जात असलेले वादग्रस्त शेड अखेर बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात हटवले आहे.


काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून गोमांस विक्री होत असल्याचे उघडकीस आणले होते.
या प्रकरणानंतर गावातील विविध हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी संघटना आणि समाज संघटनांनी शेड हटवण्याची मागणी ग्रामपंचायत, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन तसेच तहसीलदार श्रीरामपूर यांच्याकडे केली होती. परवाना नसल्याने बेकरी तात्काळ तीन दिवसांत बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मागील कारवाई च्या वेळी पोलिसांनी संबंधित इसमाकडुन सुमारे ७५ किलो मांस जप्त केले होते. हे मांस गोमांस आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.


या कारवाईच्या वेळी मा. जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच सौ. मीनाताई साळवे, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुधीर हापसे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!