मा.खा.विखे यांचे बॅनर फाडणारे चार जण जेरबंद;फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी

श्रीरामपूर-शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्या बॅनरची व तीन दुचाकींची तोडफोड करून एका...

श्रीरामपूर-
शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्या बॅनरची व तीन दुचाकींची तोडफोड करून एका दुचाकीतील बॅटरीची चोरी केली होती.याबाबत परिसरात राहणाऱ्याच एका व्यक्तीने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शिर्डी पोलिसांनीही घटनेचे गंभीर्य लक्षत घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.पोलिसांनी या घटनेचा तपासासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपासले व चार आरोपींना जेरबंद केले.दरम्यान  बॅनर फाडणारे तसेच दुचाकींची नुकसान करणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून पोलिसात जे फिर्याद देण्यासाठी आले तेच आरोपी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.त्यामुळे शिर्डीत घटनेनंतर निर्माण झालेले  तणावपूर्ण वातावरण काहीसे निवळण्यास मदत झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,लक्ष्मीनगर परिसरात गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांचे फोटो असलेले बॅनर लावले आहेत. त्यापैकी दोन बॅनर व त्या परिसरात उभ्या असणाऱ्या तीन दुचाकी मोटरसायकलची मोडतोड करून एका मोटरसायकलमधील बॅटरी चोरण्याची घटना रवीवारी मध्यरात्री घडली होती. सदर घटना घडल्याची फिर्याद विशाल राजेश अहिरे याने शिर्डी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवली.पुढे या गुन्हेतील चार आरोपींपैकी फिर्याद देणारा विशाल राजेश आहिरे राहणार लक्ष्मीनगर, शिर्डी यानेच याच्या साथीदारासह हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.तसेच त्याने आपल्या गुन्ह्याची
कबुली पोलिसांना दिली. मुख्य आरोपी विशाल राजेश आहिरे, दिनेश दवेश गोफने व राकेश सोमनाथ शिलावट सर्वं राहणार लक्ष्मीनगर, शिर्डी अशी या चार आरोपींची नावे आहेत.या चार आरोपीपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. सदर कृत्य हे त्यांनी त्यांच्या आपापसातील भांडणातून केले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.शिर्डी पोलीस स्टेशनचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, पोलीस उप निरीक्षक सागर काळे व पोलीस हे कॉ संदिप उदावंत, बाळासाहेब गोराने, केवल राजपूत, शेकडे यांनी घटनेचा तपास करून आरोपींना जेरबंद केले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!