मा.खा.सुजय विखे यांचे बॅनर फाडले; शिर्डीत विखे समर्थकांनी व्यक्त केला संताप

श्रीरामपूर-शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्या बॅनरची तोडफोड केली.शिर्डी हा विखे पाटलांचा बालेकिल्ला...

श्रीरामपूर-
शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मा. खा. डॉ. सुजय विखे यांच्या बॅनरची तोडफोड केली.शिर्डी हा विखे पाटलांचा बालेकिल्ला असल्याने त्याच ठिकाणी सुजय विखे यांचा बॅनर फाडला जाण्याची ही घटना धक्कादायक मानली जात आहे. दरम्यान या घटनेने विखे पाटील यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत पोलिसांनी तात्काळ आरोपींना शोधून काढण्याची मागणी लावून धरली आहे. या अज्ञात आरोपीनी फक्त बॅनरचीच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या काही दुचाकींचीही तोडफोड केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विखे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. घटनेची माहिती मिळताच मा. खा. डॉ. सुजय विखे समर्थक मोठ्या संख्येने शिर्डी पोलिस ठाण्यात धाव घेतली. समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. शिर्डी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून घटनेचा शोध शिर्डी पोलिस घेत आहेत.
पोलिस तपासात काय निष्पन्न होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.या घटनेवर मा. खा. सुजय विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आपण खमकी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पुढिल काळातही त्यांच्या विरोधात आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असून मतदारसंघातील जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जाणार आहेत. तसेच या अशा घटनांना मी फार महत्व देत नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!