दारूबंदीसाठी माताभगिनींचा रुद्रावतार;पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा

श्रीरामपूर –दारूबंदी आणि मटका व्यवसाय बंदीसाठी भोकर येथील माताभगिनींनी रुद्रावतार धारण करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यासह ग्रामपंचायतीवर सोमवार...

श्रीरामपूर –
दारूबंदी आणि मटका व्यवसाय बंदीसाठी भोकर येथील माताभगिनींनी रुद्रावतार धारण करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यासह ग्रामपंचायतीवर सोमवार (दि. ८) रोजी मोर्चा काढला.याप्रसंगी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले की, 1 सप्टेंबर च्या ग्रामसभेत महिलांच्या सह्या घेवून दारूबंदी चा ठराव घेण्यात आला आहे.तरीही त्यावर कारवाई झालेली नाही.त्यामुळे आज
महिलांनी दारूबंदीसाठी प्रशासनाला जागे केले. त्यांनंतर  श्रीरामपूर येथील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तातडीने भोकर येथे दाखल होत कारवाई सुरू केली. परंतू सकाळपासून येथील महिला प्रशासनाच्या दारात गेल्याने सर्वच अवैध विक्रेते सावध झाल्याने येथे दोन गोण्या रिकाम्या बाटल्याशिवाय पोलिसांच्या काहीच हाती लागले नाही. परंतु तरीही ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करत यापुढे सापळा रचून कारवाई करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्रीरामपूर येथे आमदार हेमंत ओगले यांनीही या महिलांना याच आठवड्यात दारूबंदी करणार असल्याचे आश्वासन दिले.सुरवातीला महिलांनी एकत्र येत प्रथम भोकर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेत आक्रोश व्यक्त केला. तेथून तालुका पोलीस ठाणे गाठले, त्यानंतर श्रीरामपूर तहसील कार्यालयात आमदार ओगले यांनी जलजीवन व पाणी पुरवठा या विषयावर आयोजित आमसभेत या महिलांचा मोर्चा दाखल झाला. यावेळी अनेक महिलांनी उपस्थितांसमोर आपल्या समस्या मांडल्या.त्यांनतर पोलीस प्रशासन जागे झाले.याप्रसंगी सरपंच शितल पटारे, उपसरपंच संदिप गांधले, आशा अंकुरच्या सिस्टर प्रिस्का, रेखा थोरात, सुनिता आहेर, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, प्रताप पटारे, विजय अमोलिक, वेणुनाथ डूकरे, मारूती आहेर, रमेश भालके, अंबादास काकडे, राजू लोखंडे, भाऊसाहेब डुकरे, प्रकाश चौधरी, अतुल आबुज, रामदास ढोकणे, भानुदास शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

दारू आणि मटका व्यवसाय बंदीसाठी भोकर येथील माताभगिनींनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!