कर्णकर्कश डिजेंना पोलिसांचा दणका;ध्वनी प्रदुषण अधिनियम अंतर्गत कारवाई

श्रीरामपुर-सर्वोच्च न्यायालयाने वादयांच्या आवाजाबाबत किमान डेसीबल मर्यादा ठरवुन दिलेली असुन त्याचे उल्लंघन करणाऱ्या डिजे मालक व गणेश मंडळांच्या अध्यक्षांवर श्रीरामपुर शहर...

श्रीरामपुर-
सर्वोच्च न्यायालयाने वादयांच्या आवाजाबाबत किमान डेसीबल मर्यादा ठरवुन दिलेली असुन त्याचे उल्लंघन करणाऱ्या डिजे मालक व गणेश मंडळांच्या अध्यक्षांवर श्रीरामपुर शहर पोलीसांनी कारवाई करून ध्वनी प्रदुषण अधिनियम तसेच इतर कायदयान्वये गुन्हे दाखल केले असुन डी. जे जप्ती व पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
शहरात वेळोवेळी साजऱ्या होणाऱ्या सर्वधर्मियांच्या सण उत्सव तसेच लग्न व इतर समारंभप्रसंगी कर्णकर्कश आवाजात वादय वाजविले जात असल्याचे वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत असतात. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वादयांचे आवाजाबाबत किमान डेसीबल मर्यादा ठरवुन दिलेली असुन त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणेबाबत आदेशीत केलेले आहे. चालु वर्षी गणेश विसर्जनापुर्वी कर्णकर्कश व जनतेला त्रासदायक असे वादय वाजवुन ध्वनी प्रदुषण न करणेबाबत श्रीरामपुर शहरातील डिजे चालक मालक तसेच गणेश मंडळ यांना प्रचलित कायदे व ध्वनी प्रदुषण अधिनियम २००० चे कलमांबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करुन सार्वजनिक गणेश मंडळांना बी.एन.एस.एस. १६८ प्रमाणे नोटीस देण्यात आलेली होती.दि.०६/०९/२०२५ रोजी गणेश विसर्जन मिरवणुकिदरम्यान मोठ्या आवाजात डी. जे वाजवुन ध्वनी प्रदुषण करणाऱ्या डी.जे वाहनांची श्रीरामपुर पोलीस स्टेशन मार्फत तपासणी करण्यात आली. न्यायालयाचे आदेश व पोलीसांनी दिलेल्या सुचना यांचे उल्लंघन करुन कर्णकर्कश आवाजात डी.जे वाजविणाऱ्या शंभु राजे मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश छल्लारे व डी.जे. साऊंड सिस्टीम चालक अश्पाक मोईनोद्दीन तांबोळी, अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष जयेश सुरेश झरेकर व गणेश ०९ या नांवाचे डी.जे. साऊंड सिस्टीम मालक चालक गणेश गिते,महाकाल मित्र मंडळाचे अध्यक्ष सनी गौतम व सदगुरु डी.जे. साऊंड सिस्टीम मालक/चालक निखील विलास बनसोडे यांचेविरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे ध्वनी प्रदुषण अधिनियम तसेच इतर कायदयान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन डी. जे जप्ती व पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, चा. स. फौ. सुर्यवंशी, पोहेकों दिपक कदम, पोहेकों प्रसाद साळवे, पोना दादासाहेब लोढे, पोकों आंबादास आंधळे, पोकों आजिनाथ आंधळे, होमगार्ड देवकुळे, होमगार्ड कलंके यांनी केली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!