अहिल्यानगर–मनमाड महामार्गाचे काम वेगात करा-पालकमंत्री विखे पाटील;महामार्गांच्या कामांचा घेतला आढावा

श्रीरामपूर-अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील काम वेगाने पार पाडण्यासाठी या मार्गावरील जड वाहतूक काही काळासाठी पर्यायी मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे...

श्रीरामपूर-
अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील काम वेगाने पार पाडण्यासाठी या मार्गावरील जड वाहतूक काही काळासाठी पर्यायी मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केल्या.
अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. यात अहिल्यानगर–मनमाड, पुणे–अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर, नांदूर शिंगोटे–कोल्हार, कोपरगाव–सावळीविहीर तसेच सुरत–चेन्नई या मार्गांवरील कामांचा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.या बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेऊन, येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, सदर कामे विहित वेळेत पूर्ण व्हावीत, यावर विशेष भर देण्यात आला.यासोबतच अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील काम वेगाने पार पाडण्यासाठी या मार्गावरील जड वाहतूक काही काळासाठी पर्यायी मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्याच्या देखील सूचना ना डॉ विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या.या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्तता झाल्यास जिल्ह्यातील व्यापार व औद्योगिक विकास आणखी वेग घेईल,अशी खात्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.या बैठकीस अहिल्यानगर आणि नाशिक येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक आयोजित करण्यात आली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!