श्रीरामपूर शहरात पोलिसांचे पथसंचालन;गणेश विसर्जन व ईदच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात आज पोलिसांनी गणेश विसर्जन व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पथसंचालन केले.गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी घटनांची मालिकाच सुरू झाल्यासारखी परिस्थिती...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात आज पोलिसांनी गणेश विसर्जन व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पथसंचालन केले.गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी घटनांची मालिकाच सुरू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात भरदुपारी झालेली गोळीबाराची घटना असेल किंवा माजी नगरसेवकाच्या कार्यालयाबाहेर गावठी कट्टाधारी तरुणांकडून झालेली रेकी असेल या घटनांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. हेमंत ओगले यांनीही बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर पोलिसांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर पोलिसांनीही अवैध धंदे व गुन्हेगारीवर कारवाईचे सत्र सुरू केले.आज त्याच दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी
श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी
जयदत्त भवार यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख  यांनी
गणेश विसर्जन तसेच ईद मिरवणूक मार्गावर पथसंचालन केले. या पथसंचलनात 7 पोलीस अधिकारी, 30 पोलीस अंमलदार,आरसीपी तसेच एसआरपी पथक, 40 होमगार्ड यांचा सहभाग होता.

श्रीरामपूर शहरात आज पोलिसांनी गणेश विसर्जन व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पथसंचालन केले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!