कुरियरने मागवलेली नशेची 50 इंजेक्शन पकडली;श्रीरामपूर पोलिसांनी तरुणाला केले गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करुन16 हजार 700 रु. किंमतीचे नशेचे मेफेंटर्मिन नावाचे 50 इंजेक्शन पकडले आहेत.या प्रकरणी एका तरुणाला...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई करुन
16 हजार 700 रु. किंमतीचे नशेचे मेफेंटर्मिन नावाचे 50 इंजेक्शन पकडले आहेत.या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 27/08/2025 रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत महिती मिळाली की, डी.टी.डी.सी. कुरिअर, जिजामाता चौक, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथे परवेज शेख या तरुणाने कुरिअरव्दारे नशेचे औषध व इंजेक्शन विक्री करण्याकरीता मागवले असुन तो दोन वाजेच्या सुमारास ते घेण्याकरीता येणार आहे.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना कळवुन त्यांच्या परवानगीने तसेच औषध निरीक्षक सोमनाथ बा. मुळे यांच्याशी संर्पक करुन तात्काळ पोलीस पथकास जिजामाता चौकामध्ये सापळा लावण्यास सांगितला. सदर तरुण त्या ठिकाणी येताच खात्री झाल्यांनातर तपास पथकाने डी.टी.डी.सी. कुरिअर, जिजामाता चौक, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथे तो ते पार्सल ताब्यात घेत असतानाच त्याला ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव परवेज जमीर शेख, वय 23 वर्षे, रा. आयडीबीआय बॅक समोर, नेवासा रोड वॉर्ड नं.06, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातुन 16700 रु. किंमतीचे मेफेंटर्मिन औषधाच्या 10 एम.एल.च्या 50 बॉटल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे. या तरुणा विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, प्रशि. पोलीस उपनिरीक्षक अजित धाराव, पोकों संपत बडे, पोकॉ अमोल पडोळे, पोकॉ सचिन दुकळे, पोकॉ संभाजी खरात, पोकों अजित पटारे, पोकॉ राहुल पौळ, पोकों आजिनाथ आंधळे, मपोकों मिरा सरग तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

श्रीरामपूर पोलिसांनी एका तरुणाला नशेच्या इंजेक्शन सह ताब्यात घेतले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!