दोन सराईत आरोपी गजाआड;1 लाख 20 हजारांचा मुद्देमालही जप्त

श्रीरामपूर-शहरातील के. पी. सुपर मार्केट फोडून झालेल्या चोरीचा उलगडा करताना श्रीरामपूर शहर पोलीसांनी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून...

श्रीरामपूर-
शहरातील के. पी. सुपर मार्केट फोडून झालेल्या चोरीचा उलगडा करताना श्रीरामपूर शहर पोलीसांनी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 1,20,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी रात्री फिर्यादी सुमित शम्मीकुमार गुलाटी (वय 33, रा. दशमेशनगर, पंजाबी कॉलनी, श्रीरामपूर) यांच्या सुपर मार्केटचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानातील 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. 771/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच गुप्त माहितीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला. अखेर माहिती मिळाल्यानुसार सराईत गुन्हेगार अभय ऊर्फ किशोर समज केदारे (वय 19, रा. वारुळाचा मारुती, नालेगाव, जि. अहिल्यानगर) व समीर जाकीर सय्यद (वय 20, रा. बुरुगाड रोड, जाहागिरदार चाळ, अहिल्यानगर, सध्या रा. शाहूनगर, केडगाव) यांना अटक करण्यात आली. सखोल चौकशीत आरोपींनी आपल्या साथीदारांसह (अकबर, पूर्ण नाव-पत्ता अज्ञात, फरार व अन्सार शेख, रा. नालेगाव, जि. अहिल्यानगर, फरार) मिळून ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 45,630/- रोकड (त्यात विविध दराचे चलन व नाणी समाविष्ट) 75,000/- किमतीची काळ्या रंगाची, बिगर नंबरची टीव्हीएस रायडर मोटारसायकल (चेसिस नंबर MD62AF92R1L28879) जी चोरी करताना वापरण्यात आली. अशाप्रकारे एकूण ₹1,20, किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पो. नी. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकातील पु.उ.नि. समाधान सोळंके, पो.हे.कॉ. जयवंत तोडमल, पो.ना. भागवत शिंदे, पो.कॉ. अमोल पडोळे, सागर बनसोडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकडे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, पांडुरंग चौधरी, गणेश तुपे व महिला पो.कॉ. मीरा सरग यांनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीरामपूर शहर पोलीसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!