श्रीरामपूरच्या वैभवात भर टाकणारे पत्रकार भवन प्रेरणादायी-माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक;पत्रकार भवन येथे बेंचेसचे लोकार्पण

श्रीरामपूर-प्रेस क्लबने श्रीरामपूर येथे उभी केलेली पत्रकार भवनाची सुंदर वास्तू अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिली वास्तू आहे, पत्रकार भवन हे श्रीरामपूर शहराच्या वैभवात...

श्रीरामपूर-
प्रेस क्लबने श्रीरामपूर येथे उभी केलेली पत्रकार भवनाची सुंदर वास्तू अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिली वास्तू आहे, पत्रकार  भवन हे श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर टाकणारे असून या वास्तू मधून पत्रकाराना  सतत प्रेरणा मिळत राहील असे  श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी म्हटले असून अशा ठिकाणी सेवाभावी व्यक्ती व संस्थांनी मदत केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले लायन्स क्लब (श्रीरामपूर) यांच्या सौजन्याने माजी खासदार स्वर्गीय गोविंदराव आदिक  यांच्या स्मरणार्थ पत्रकार भवन येथे बेंचेस देण्यात आले, याप्रसंगी आदिक बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, स्वर्गीय आदिक व पत्रकार यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, अनेक वेळा पत्रकारांशी हितगुज करून शहरासह नागरिकांचे प्रश्न समजून घेत होते, ज्या ज्या गोष्टी पत्रकारांनी सुचविल्या, त्या त्यांनी सोडवील्या. राज्यात काम करत असताना स्वर्गीय आदिक यांनी साहित्यिक, पत्रकार, विविध राजकीय पक्ष, संघटना यांच्या बरोबर असलेला ऋणानुबंध कायम ठेवला. हीच परंपरा आपण श्रीरामपूर मध्ये पुढे नेत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, स्वर्गीय आदिक यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लबने पत्रकार भवन येथे बसण्यासाठी दिलेले बेंचेस याचा लोकार्पण करताना आपणास निश्चित आनंद होत आहे, असा सेवाभाव इतर सामाजिक संघटनांनी दाखवावा, असेही आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी क्लबचे सदस्य व पत्रकार अनिल पांडे यांनी पत्रकार भवन साठी 100 खुर्च्या देण्याची घोषणा केली.
लायन्स क्लबचे अध्यक्ष राहुल आरबट्टी
म्हणाले की लायन्स क्लबच्या माध्यमातून देशभर अनेक प्रकारचे सेवाभावी उपक्रम राबविले जातात, त्यात प्रामुख्याने स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, गरजूंना आर्थिक मदत, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस, विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान केला जातो असे सांगून ते म्हणाले की, लायन्स क्लबच्या अनेक उपक्रमांना पत्रकार चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देतात, त्याच भावनेतून पत्रकार भवन या ठिकाणी स्वर्गीय गोविंदराव आदिक यांच्या स्मरणार्थ बेंचेस देण्यात आले.
प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड यांनी पत्रकार भवनासाठी लायन्स क्लबने जो सेवाभाव दाखवला, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नगर जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकार भवन उभे राहण्यासाठी नागरिकांनी मदत करण्याची आवश्यकता आहे. भविष्यकाळात पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या तरुण पिढीसाठी पत्रकार भवन निश्चितच प्रेरणादायी असेल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार अनिल पांडे यांनीही रोटरी क्लबच्या वतीने पत्रकार भावनासाठी शंभर खुर्च्या लवकरच देणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी लायन्स क्लबचे प्रसाद नागरे, योगेश पटेल, पुरुषोत्तम झंवर, जयकिसन मिलानी, सोमेश देशमुख, चेतन भुतडा, दीपिका आरबट्टी, पूनम गुलाटी, वर्षा मिलानी, पुष्पा खैरे, पत्रकार महेश माळवे, राजेंद्र बोरसे, प्रकाश कुलथे, मधुकर माळवे, नितीन शेळके, आदित्य आदिक, अविनाश पोहेकर, अनिरुद्ध भिंगारवाला आदि उपस्थित होते. पत्रकार नवनाथ कुताळ यांनी आभार मानले.

लायन्स क्लब (श्रीरामपूर) यांच्या सौजन्याने माजी खासदार स्वर्गीय गोविंदराव आदिक  यांच्या स्मरणार्थ पत्रकार भवन येथे बेंचेस देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!