महिला बचत गटांना एकूण १७ लाखाचे कर्ज मंजूर;बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे बचत गटांना कर्ज प्रमाणपत्र वाटप

श्रीरामपूर-बँक ऑफ महाराष्ट्र, टाकळीभान शाखेतर्फे माळवाडगाव येथील स्वयंसहायता बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून ग्रामीण भागातील महिलांना...

श्रीरामपूर-
बँक ऑफ महाराष्ट्र, टाकळीभान शाखेतर्फे माळवाडगाव येथील स्वयंसहायता बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर बाळासाहेब हुरूळे व श्याम आसने यांनी बचत गटाच्या महिला सदस्यांना एकूण १७ लाखाचे कर्ज मंजूरी प्रमाणपत्रे देऊन त्यांचे  अभिनंदन केले. महिलांच्या स्वावलंबनासाठी बँकेने केलेला हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.या प्रसंगी बोलताना बँक अधिकारी भास्कर रच्चा , आबासाहेब घोडेचोर आणि  दिलीप कापसे सांगितले की, “स्वयंसहायता बचत गटांद्वारे महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे हा बँकेचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमातून महिलांची उद्योजकता आणि गावाचा विकास दोन्ही साध्य होईल.माळवाडगावातील बचत गटातील महिलांच्या  अध्यक्ष वर्षा काळे यांनी बँकेचे आभार मानत हा उपक्रम त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय असल्याचे सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!