उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘नेता’ लाचलुचपतच्या जाळ्यात;पोलिसासाठी स्वीकारली दीड लाखांची लाच

श्रीरामपूर-गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या बदल्यात अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांच्या...

श्रीरामपूर-
गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या बदल्यात अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तडजोडीनंतर यातील दीड लाख रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अशोक गायकवाड यांच्या मार्फत स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.दोन्ही आरोपींना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाच घेताना अडकलेले अशोक गायकवाड यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.अजितदादा यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर नगरमध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात गायकवाड यांचा पुढाकार होता. सुरुवातीच्या काळात ते रिपब्लिकन पक्षात होते. मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षात त्यांनी काम केले. मधल्या काळात त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही काम केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे नोंदलेल्या गांजाच्या केसमध्ये आरोपी न करता साक्षीदार करण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे कोतवाली पोलीस स्टेशनचे राजेंद्र प्रभाकर गर्गे, सहाय्यक फौजदार यांच्या वतीने मध्यस्थी करणाऱ्या अशोक रामचंद्र गायकवाड यांनी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती दिनांक २०/०८/२०२५ रोजी तक्रारदार यांच्याकडून लाचेची १,५०,००० रुपयांची रक्कम गायकवाड यांनी स्वीकारली.या लाचेच्या मागणीस सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी कारवाई दरम्यान स्पष्ट झाले. दिनांक २१/०८/२०२५ रोजी लावण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार हे लाचेची रक्कम अशोक रामचंद्र गायकवाड यांना देत असताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.याप्रकरणी अशोक रामचंद्र गायकवाड, खाजगी इसम वय  71, वर्षे  व्यवसाय शेती , राहणार बिशोब लॉइड कॉलनी सावेडी, जिल्हा अहिल्या नगर, राजेंद्र प्रभाकर गर्गे वय 57 वर्ष सहाय्यक फौजदार कोतवाली पोलीस स्टेशन राहणार समर्थ नगर सावेडी जिल्हा अहिल्यानगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा तुषार सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.यात पोलीस हवालदार विनोद चौधरी,चालक पोलीस हवालदार विनोद पवार, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांचा सहभाग होता.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!