पत्रकार आगे यांना संरक्षण द्या;पत्रकार संघटनांची जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-दै.जय बाबाचे संपादक अॅड. बाळासाहेब आगे यांना जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी मोकाट असल्याने त्याला तातडीने अटक करावी आणि आगे यांना...

श्रीरामपूर-
दै.जय बाबाचे संपादक अॅड. बाळासाहेब आगे यांना जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी मोकाट असल्याने त्याला तातडीने अटक करावी आणि आगे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्याकडे श्रीरामपुरातील पत्रकार संघटनांनी केली आहे.श्रीरामपुरात नशेचे इंजेक्शन पकडल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल झालेला असताना आणि त्याची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बातमी प्रकाशित केल्यानंतर इन्स्टाग्रामवर गणेश मुंढे नावाच्या नशेच्या इंजेक्शन प्रकरणातील आरोपीने थेट मारण्याची धमकी दिली. याकडे एसपी घार्गे यांचे लक्ष वेधत सदर प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होताच १० मिनीटात त्या आरोपीने इन्स्टाग्रामवरील धमकीचा मेसेज डिलीट केला. याचा अर्थ त्याचे लागेबांधे कोठे आहे? हे शोधावे.आगे यांच्या जिवीताला धोका असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी सर्वांची मागणी असल्याचे सांगितले.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, कार्याध्यक्ष विष्णू वाघ, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, रमण मुथ्था, रमेश कोठारी, बद्रीनारायण वढणे, भास्करराव खंडागळे, सुनील मुथ्था, महेश माळवे, नागेश सावंत, नवनाथ कुताळ, अनिल पांडे, सुनील नवले, प्रदीप आहेर, रवि भागवत, देविदास देसाई, दिलीप दायमा, सुरेश कांगणे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे, उपाध्यक्ष सलिम पठाण, हरिभाऊ बिडवे, एकनाथ डांगे, संदीप शेरमाळे, राजेंद्र भोसले, स्वामीराज कुलथे आदींसह श्रीरामपूर पत्रकार संघ, श्रीरामपूर प्रेस क्लब, श्रीरामपूर मराठी पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच इतर पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एसपी सोमनाथ घार्गे यांनी याबाबत योग्य ती दखल घेवून कारवाई केली जाईल, असे सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!