श्रीरामपूर-
दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत महिला मंडळ, श्रीरामपूर यांच्यावतीने रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शैक्षणिक कामासाठी तसेच आपत्कालीन वेळी शिक्षक व पालकांना विद्यार्थ्यांचा रक्तगट माहीत असणे आवश्यक आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला मंडळ श्रीरामपूर यांच्यावतीने सुमारे 500 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या कामी डॉ.अर्चना सोमानी व त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना रक्तगट माहीत असण्याचे फायदे यावेळी सांगण्यात आले. यावेळी महिला मंडळाच्या प्रमुख विश्वस्त शैलजा वाघमारे, विश्वस्त अनिता जोशी ,ज्येष्ठ सल्लागार डॉ.अंजली आगाशे,अध्यक्षा शितल मुथा उपाध्यक्ष रमा पोफळे, सचिव प्रीती आगाशे, सहसचिव स्मिता जोशी,खजिनदार राणी बाबेल अस्मिता कुलकर्णी, साधना चुडीवाल नीता जगताप, सुनिता मांडण, अनघा देशपांडे, नलिनी देशपांडे उपस्थित होत्या. शिबिरापूर्वी सरस्वती पूजन व स्वर्गीय दादा जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रीती भणगे यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन ऋषिकेश जोशी, प्रभारी मुख्याध्यापक भरत शेंगाळ, मीना जायभाये, स्मिता गोरे, भाग्येश ठाणगे, अनिल गिरमे, मंगल वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विजय दवणे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक परदेशी यांनी आभार मानले.
