आकारी पडीत शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत 6 मे ला बैठक;शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीनंतरच उद्योगाला जमीन-महसूलमंत्री बावनकुळे

श्रीरामपूर–राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत आकारी पडीत शेतकऱ्यांची नुकतीच...

श्रीरामपूर
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत आकारी पडीत शेतकऱ्यांची नुकतीच सविस्तर चर्चा झाली.मंत्री महोदयांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत दिनांक 6 मे 2026 रोजी निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई येथे मंत्रालय येथे नुकतीच अकारीपडीत शेतकऱ्यांच्या जमिनी वाटप प्रक्रिया संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली.त्यात जोपर्यंत शेतकऱ्यांना जमिनी वाटप होत नाही आणि त्यांच्या जमिनीची उपलब्धता करून त्या सुरक्षित करून दिली जात नाही तोपर्यंत शासन उरलेली जमीन उद्योगाला देण्यासंदर्भात निर्णय घेणार नाही असे ठरले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकारी पडीत शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या मुळ मालक असलेल्या वारसांना परत करण्यासंदर्भात बुधवार दि.२२ रोजी पालकमंत्री ना.राधाकॄष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.यावेळी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड.अजित काळे,शेती महामंडळाचे कार्यकारी संचालक अन्य वरिष्ठ अधिकारी,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, याचिकाकर्ते गिरीधर आसने,माजी सभापती उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, डॉ शंकर मुठे,भिमभाऊ बांद्रे,शरद आसने यांच्यासह आकारी पडीत नऊ गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.या बैठकीत महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,प्रथम आकारी पडीत शेतकरी बांधवांना जमीन मोजणी करुन दिली जाईल. त्यानंतरच राहीलेली जमीन उद्योगासाठी देण्यात येईल.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!