नगरपरीषदने दुकाने व बीफ मार्केट केले सील;थकबाकीपोटी कडक कारवाई

श्रीरामपूर-नगरपरीषद कडून थकबाकी रक्कमपोटी दुकान गाळा व बीफ मार्केट सील करण्याची कडक कारवाई करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी...

श्रीरामपूर-
नगरपरीषद कडून थकबाकी रक्कमपोटी दुकान गाळा व बीफ मार्केट सील करण्याची कडक कारवाई करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.श्रीरामपूर  नगरपरिषद क्षेत्रातील वार्ड न.२ येथील बीफ मार्केट व पापा जलाल मार्केट येथील ४ गाळे धारकांना वारंवार भेटी व नोटीस, दूरध्वनी संपर्क, अधिपत्र देउन सुध्दा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे श्रीरामपूर मुख्याधिकारी यांचे निर्देशानुसार कर विभाग मार्फत कराचा भरणा रू १०,९०,०००/- या थकबाकी रकमेचा भरणा न केल्यामुळे दि.१३/०३/२०२६  रोजी गाळे सील ची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच वार्ड क्र.२ मधील मालमत्ता धारकांचे ४ नळ कनेक्शन देखील खंडीत करणेत आले आहे,  तरी शहरातील सर्व नळ कनेक्शन धारक व मालमत्ता धारक यांनी लवकरात लवकर कर भरणा करून नगरपालिकेस सहकार्य करावे व होणारी कटू कारवाई टाळावी.सदरच्या कारवाईच्या वेळेस श्रीरामपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी महेंद्र ताकपिरे, वसूल विभाग कर विभाग प्रमुख  विकास घटकांबळे, कर निरीक्षक सुभाष बाचकर , वार्ड लिपिक गणेश गवळी, अरुण तुपे, योगेश प्रधान, ,ईश्वर शेळके, नितीन पवार, अमोल गायकवाड,  रोहित भांबरे, राजेश थोरात, ,विशाल चौधरी, शंभू छल्लारे , आदी कर्मचारी उपस्थित होते सदर कारवाई सर्व वार्डातील थकबाकी धारकांकडे वसुली कामी सदरचे पथक रोज फिरणार असून सर्व मालमत्ता धारकांनी  आपल्याकडील घरपट्टी पाणीपट्टी गाळाभाडे थकबाकी रक्कम लवकरात लवकर भरून श्रीरामपूर नगर परिषदेस सहकार्य करावे अशी आवाहन श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व नगराध्यक्ष करण ससाणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
तसेच मार्च महिन्यामुळे नागरिकांना सुविधा म्हणून शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी देखील कर भरणा करण्यासाठी वसुली विभागाचे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. याची सर्व मालमत्ता धारकांनी नोंद घ्यावी.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!