महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले;गॅस दरवाढ तातडीने मागे घ्या-नगराध्यक्ष ससाणे

श्रीरामपूर-देशामध्ये निर्माण झालेल्या गॅस टंचाई व दरवाढी विरोधात आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या...

श्रीरामपूर-
देशामध्ये निर्माण झालेल्या गॅस टंचाई व दरवाढी विरोधात आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शन करत आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार मिलिंद कुमार साळवे यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव दिपाली ससाणे उपस्थित होते.
यावेळी नगरध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, सध्या देशामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून घरगुती व व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक उद्योग धंदे बंद ठेवावे लागत आहे. याप्रकाराबाबत सरकार आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नसल्याचे म्हटले.
यावेळी सचिन गुजर म्हणाले की, ज्या वेळेला ४०० रुपयाला घरगुती वापराचे गॅस सिलेंडर होते त्यावेळी सध्या सत्तेत असलेली भाजपा आंदोलन करत होती आणि आज सगळीकडे भाजपाची सत्ता असताना गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहे हे सरकारचे अपयश असल्याचे ते म्हटले.बाबसाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रमोद भोसले, लकी सेठी, अभिजित लिप्टे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सरकारचा निषेध व्यक्त केला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, सभापती दिपक वमने, नगरसेवक कलीम कुरेशी, लकी सेठी, गोपाल लिंगायत, महंता यादव, सुभाष पोटे, बिट्टू कक्कड , अशोक बागुल, सुधीर वायखिंडे, प्रकाश थोरात, रज्जाक पठाण, रवी खिलारी, अभिजीत लिपटे, कांतीशेठ पटेल, विलास लबडे, नवाज जहागिरदार, संजय गोसावी, सुनील साबळे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रावसाहेब आल्हाट,नजीरभाई शेख,भाग्येश लोखंडे, सनी मंडलिक , विशाल साळवे अनिल वाघ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!