अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजनांना गती द्या-मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांचे निर्देश

श्रीरामपुर-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी असे निर्देश राज्याचे जलसंपदा...

श्रीरामपुर-
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
नागपूर विधानभवनात महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार अभिमन्यू पवार,आमदार ॲड. राहुल कुल,सामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटील, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख तसेच वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे उपस्थित होते.यावेळी मंत्री श्री. विखे – पाटील यांनी महामंडळाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा व्यापक प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावर मेळावे, शिबिरे आणि माहितीपर उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात यावा. यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती सहज पोहोचण्यास मदत होईल. तसेच, महामंडळाचे संकेतस्थळ (Website) सुरळीत करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

माळवाडगाव येथे पंचदिवशीय कीर्तन महोत्सवास उत्साहात प्रारंभ

श्रीरामपूर -तालुक्यातील माळवाडगाव येथे धर्मध्वजाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाला भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सुरुवात झाली. स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कविराज

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

Latest News

Trending News

error: Content is protected !!