‘अशोक’कडून दोनदा तोडणी वाहतूक खर्चात कपात; ‘स्वाभिमानी’ची ११७ रुपये प्रती टन परत करण्याची मागणी

श्रीरामपूर-अशोक सहकारी साखर कारखान्याने २०२१-२२ या हंगामातील गाळपास आलेल्या ऊसाच्या एफआरपीमधून दोनदा तोडणी वाहतूक खर्च कापल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष...

श्रीरामपूर-
अशोक सहकारी साखर कारखान्याने २०२१-२२ या हंगामातील गाळपास आलेल्या ऊसाच्या एफआरपीमधून दोनदा तोडणी वाहतूक खर्च कापल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले व सुरेश ताके यांनी साखर सहसंचालकांकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले की, एकदा गाळपास आलेल्या उसातुन  दोनदा कपात म्हणजे अशोकच्या संचालक मंडळाचा शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडाच आहे. सोमवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी प्रति टन जास्तीचे घेतलेले ११७ रुपये प्रमाणे ७ कोटी २१ लाख ५६ हजार २८७ रुपये परत मागावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.निवेदनात पुढे म्हटले की, २०२०-२१ घ्या हंगामात अशोक सहकारी साखर कारखान्याचे ६,९०,००५ टन गाळप झाले होते पैकी ६,००,२१२ में. टन गाळप १ नोव्हेंबर ते ३१ मार्च या काळात झाले होते. १ एप्रिल ते २३ एप्रिल या २३ दिवसांत ८९,७३३ में. टन गाळप झाले होते. २०२०-२१ या वर्षात अशोक ने संपूर्ण हंगामातील गाळप झालेल्या ऊसाचा तोडणी वाहतूक खर्च ऊस उत्पादकांच्या एफआरपीमधून वजा केला होता परंतु त्यानंतर २०२१-२२ साली अशोक कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक वर्षनिहाय तोडणी व वाहतूक खर्चाची आकारणी केली व आजपर्यंत त्याच पध्दतीने आकारणी होत आहे.त्यामुळे 2021-22 या हंगामात मागील हंगामातील 1/4/21 नंतरचे 89,733 में.टन ऊसाची तोडणी व वाहतूक खर्च 7,21,56,287 रुपये दुसऱ्यांदा म्हणजे आर्थिक वर्ष 1/4/2021 ते 31/3/2022 यामधे तोडणी वाहतूक झालेल्या ऊसाच्या FRP मधुन कपात केलेली आहे. त्यामुळे मागील वर्षी म्हणजे 2020-21 मधे 629 रुपये प्रती टन असलेला तोडणी वाहतूक खर्च २०२१-२२ मधे ७८१ रुपये प्रती टन इतका वाढलेला आहे.त्यातही २०२०-२१ चे हंगामात कारखान्याचे गाळप सुरू झाल्यापासून ते ३१ मार्च पर्यंत ६,००२७२ में.टन ऊसाचे तोडणी वाहतूक खर्चासाठी ६०३.३२ रुपये खर्च आला तर १ एप्रिल ते कारखाना बंद होईपर्यंत २३/०४/२०२१ या २३ दिवसांत ८९,७३३ में.टन गाळप झालेले होते त्यासाठी प्रती मे.टन ८०४ रु आहे म्हणजे एकाच हंगामात शेवटचे २३ दिवस प्रती टन २०० रुपयांची  वाढ केलेली होती.२०२१-२२ चे हंगामात ८,५२,७९२ टन ऊसाचे गाळप झालेले होते. पैकी ६,१३,४१२ टन गाळप ३१ मार्च २०२२ पर्यंत झालेले होते.उर्वरित गाळप १ एप्रिल ते ११ जुन या काळात झालेले होते.मागील हंगामातील ७,२१,५६,२८७ ÷ ६,१३,४१२ टन = ११७  प्रती टन पैसे ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांना अशोकच्या संचालक मंडळाने दिलेच पाहिजेत.या विषयी चे निवेदन स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले,देवराज कोकणे व सुरेश ताके  यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयात दि. २६/०९/२०२५ रोजी दिले.त्यासाठी सभासदांनी येत्या सोमवारी होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत आग्रही मागणी करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी केले आहे.

‘अशोक’च्या चुकीच्या निर्णयप्रक्रियेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले व सुरेश ताके यांनी साखर सहसंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!