पालकमंत्री विखे पाटील मोटरसायकलवरून थेट पूरग्रस्तांच्या मदतीला;नुकसानग्रस्त नागरिकांना दिला धीर

श्रीरामपूर-राहत्यासह तालुक्यातील कोल्हार,लोणी आणि पंचक्रोशी भागात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. रविवारी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

श्रीरामपूर-
राहत्यासह तालुक्यातील कोल्हार,लोणी आणि पंचक्रोशी भागात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. रविवारी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष करून बाधित गावांची पाहाणी केली. कोल्हारमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील थेट मोटरसायकलवरून पूरग्रस्त परिसरात पोहोचले. परिस्थितीची थेट पाहणी करण्याची त्यांची पद्धत सर्वांना भावली आणि नुकसानग्रस्त नागरिकांना काहीसा आधार मिळाला.यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून आवश्यक ती मदत देण्याचे आदेश दिले.
राहाता तालुक्यात केवळ एका रात्रीत २०० मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने ग्रामीण आणि शहरी भाग पाण्याखाली गेला. शेतजमिनी तसेच नागरी वसाहतींमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.कोल्हार परिसरात पाहणीदरम्यान पाणी नालींमध्ये अडकून राहिल्याचे कारण अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे  पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने नाले व प्रवाह अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिले.पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात आले. प्रशासनाकडून बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या तर स्थानिक युवकांनी कुटुंबांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.लोणी बुद्रुक, पाथरे आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधून तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कोल्हारमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थेट मोटरसायकलवरून पूरग्रस्त परिसरात पोहोचले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!