अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा;माळवाडगाव सहकारी सेवा संस्थेचा ठराव

श्रीरामपूर-माळवाडगाव सहकारी सेवा संस्थेची सन2024-25 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.22 रोजी संस्थेचे चेअरमन गिरीधर आसने यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या...

श्रीरामपूर-
माळवाडगाव सहकारी सेवा संस्थेची सन2024-25 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.22 रोजी संस्थेचे चेअरमन गिरीधर आसने यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
याप्रसंगी माळवाडगाव गावात अतिवृष्टीमुळे
शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत तसेच याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विनंती करण्यात यावी असा ठराव करण्यात आला.या खेरीज जिएसटी बाबत करण्यात आलेल्या सुधारणा संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन,सर्व सभासदांनी वृक्षरोपण करणे,माळवडगाव विविध कार्य सोसायटीमध्ये खत विक्री चालू करणे असे विविध ठराव यावेळी करण्यात आले.तसेच माळवडगाव सोसायटीने तालुक्यामध्ये सर्वप्रथम वसुली केल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सभासद यांच्या अभिनंदनचा ठरावही यावेळी मांडण्यात आला.सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज पार पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी किसनराव धोंडीबा आसने, नानासाहेब दत्तात्रय असणे, रावसाहेब तुकाराम असणे, सुरेश भाऊसाहेब चिडे,श्रीधर किसनराव असणे, बाबासाहेब साहेबराव असणे, भाऊसाहेब जयंत असणे, गोरख रायभान दळे, गोरख रामभाऊ दांगट, सुभाष मोरे, आप्पासाहेब काळे, विठ्ठल बोरडे, रामभाऊ विठ्ठल असणे , दिलीप असणे,सदाशिव असणे,प्रसाद जगरूपे, अशोक भागवतराव असणे, साहेबराव करपे, भाऊसाहेब आढाव, दिलीप हुरुळे ,शरद असणे, नरेंद्र असणे, अशोक गणपत असणे, अमोल मोरे, दादासाहेब अनुसे, दत्तात्रेय मोरे, शोएब पठाण ,सचिन असणे, पत्रकार विठ्ठल राव असणे, जयदीप असणे.राजेंद्र आदिक, सतीश असणे, राहुल आढाव, दादासाहेब असणे, दीपक असणे, दत्तात्रय काळे, किशोर तांबे, भानुदास चिडे, सुभाष असणे, भाऊसाहेब असणे आदींसह बहुसंख्येने सर्व सभासद हजर होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!