निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा;मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू असून, सदर रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर त्वरित कारवाई करण्यात...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू असून, सदर रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत विविध पक्षांनी उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीरे यांना निवेदन दिले.शहरातील छत्रपती शिवाजी रोड, बेलापूर रोड, संगमनेर रोड, गोंदवणी रोड, नेवासा रोड आदी प्रमुख रस्त्यांवर श्रीरामपूर नगर परिषदेने काही ठेकेदारांना डांबरीकरणाचे ठेके दिले होते. परंतु अवघ्या चार-पाच महिन्यांतच या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे महिला, वृद्ध, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), जिल्हाकार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशन, अध्यक्ष गौतम उपाध्ये युवा स्वाभिमान पक्ष जिल्हाध्यक्ष विवेक माटा व राष्ट्रीय जनसेवा पार्टी जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्याधिकारी तापकीरे यांची भेट घेऊन ठेकेदारांकडूनच पुन्हा डांबरीकरण करून घेण्याची आणि त्यांनी केलेल्या निकृष्ट कामामुळे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष  त्रिभुवन यांनी सांगितले की, काही ठेकेदारांनी  तीन कोटी रुपयांची कामे मिळवून देखील शिल्लक दहा-पंधरा पावले राहिलेले काम करायचे त्यांच्या जीवावर आले होते. त्यांना संबंधित अधिकाऱ्याने विचारले असता ते म्हणाले. “आमचा ठेका फक्त येथेपर्यंतच होता,” असे कारण सांगत पुढील काम करण्याचे टाळण्यात आले आहे, हे अत्यंत गंभीर आहे.नगरपालिकेने या खड्ड्यांवर तात्पुरता उपाय म्हणून मुरूम टाकण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र मुरूम टाकल्याने खड्डे पुन्हा पडणारच आहेत. त्यामुळे योग्य दर्जाचे डांबरीकरण करूनच खड्डे बुजवण्यात यावे, अन्यथा नगरपरिषदेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

ठेकेदारांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन  उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीरे यांना देण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!