मराठ्यांचा श्रीरामपूरात जल्लोष;फटाक्यांची आतषबाजी अन गुलालाची उधळण

श्रीरामपूर-मराठा आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत गेल्या दोन वर्षापासून अग्रभागी असलेल्या अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशस्वीतेचा शहरात गुलाल उधळून...

श्रीरामपूर-
मराठा आरक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेत गेल्या दोन वर्षापासून अग्रभागी असलेल्या अखंड मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाच्या यशस्वीतेचा शहरात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. त्यानिमित्त बेलापूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड,मेन रोड मार्गे मोटरसायकल रॅली काढून महात्मा गांधी पुतळ्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत केलेले आंदोलन यामुळे मराठा आरक्षण मिळाल्याने  शहरातील व ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी दैनिक जय बाबा कार्यालयापासून डोलीबाजा वाद्य,फटाक्यांची आतिषबाजी करीत भगवे ध्वज घेऊन मोटर सायकल रॅली काढली. यावेळी नगरपरिषद समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार करून जय भवानी जय शिवाजी,एक मराठा लाख मराठा,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नागेश सावंत म्हणाले की, हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅजेट मधून आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाला न्याय मिळाला असून आमच्यासाठी आजचा क्षण म्हणजे एक प्रकारची दिवाळीच असल्याचे सांगितले.तर ॲड,बाळासाहेब आगे म्हणाले,आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या असून मराठा समाजाला जरांगे पाटलांसारखा एक लढाऊ योद्धा मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवस हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्व आभार मानत आहोत.
तसेच यावेळी सुरेश कांगुणे यांनी सांगितले की,गेल्या दोन वर्षापासून आम्ही अखंड मराठा समाज श्रीरामपूर आरक्षणाच्या प्रश्नावर विविध प्रकारचे आंदोलन केले आहे.या सर्व आंदोलनांना श्रीरामपूर येथील सर्व जाती धर्माच्या बांधवानी मोठे सहकार्य केलेले आहे,त्यांचे आम्ही आभार मानत असल्याचे सांगितले. या आनंदोत्सवासात माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक,पंडितराव बोंबले, अण्णासाहेब डावखर,राजेंद्र मोरगे,शरद अंबादास नवले, सुधाकर बोंबले,शिवाजीराव भोसले,प्रमोद भोसले,ॲड, गणेश सिनारे,विकास डेंगळे ऋषिकेश मोरगे,अमोल बोंबले,रोहन डावखर,ॲड, अरुण लबडे,ज्ञानेश्वर मोरगे,विशाल धनवटे,गोकुळ गायकवाड,मनोज शेळके,दत्तात्रय जाधव,
सुधाकर तावडे,बी.जी.गायधने, रोहीत भोसले,अशोक पिसे,गोकुळ कुताळ,संजय गांगड,योगेश जाधव,केतन खोरे,शशिकांत शिंदे,पद्माकर देशमुख,प्रसाद खरात,राजेंद्र भोसले,युवराज थोरात, नंदकिशोर लबडे,
संजय करंडे,बाळासाहेब मेटे,विनोद उंडे,चंद्रकांत काळे,प्रतिक यादव,ॲड,कैलास आगे,पोपटराव आदिक,बाबासाहेब डांगे,ऋषिकेश दिघे,महेश लबडे,अजिंक्य काळे,गौरव नवले,यश नवले, प्रवीण फरगडे,युवराज आगे, गुरु आगे,यश शेळके, आदित्य शेळके,लकी सेठी यांच्यासह अनेक बांधव सहभागी झाले होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!