वडाळा बंगला रस्त्याची प्रचंड दुरावस्था;स्थानिकांचा रस्ता रोको आंदाेलनाचा इशारा

श्रीरामपूर-तालुक्यातील वडाळामहादेव बसस्थानक ते जलसंपदा कार्यालय (वडाळा बंगला) या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु...

श्रीरामपूर-
तालुक्यातील वडाळामहादेव बसस्थानक ते जलसंपदा कार्यालय (वडाळा बंगला) या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी आहे.अन्यथा येथील रहिवाशांचे वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन करण्याचा इशारा वडाळामहादेव सेवा संस्थेचे चेअरमन दिलीपराव पवार यांचेसह येथील नागरिकांनी दिला आहे.वडाळामहादेव येथे जलसंपदा विभागाचे शाखा कार्यालय असलेने परिसरातील शेतकरी, जलसंपदा विभागाचे कर्मचारी यांची येथे माेठी वर्दळ असते, तर कार्यालयाच्या जवळच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. बसस्थानक चाैक ते जलसंपदा कार्यालय हा साधारण अर्धा किलोमीटर रस्ता आहे. इंग्रजांच्या काळात दगडमातीचा माेठा भराव टाकून हा रस्ता तयार करण्यात आला हाेता. त्यानंतर १९९३ साली या रस्त्याचे काम जलसंपदा विभागाने केले हाेते. मात्र गेल्या ३२ वर्षांपासून या रस्त्यावरील एक खड्डेही जलसंपदा विभागाने बुजविले नाही. आजपर्यंत अनेकदा स्थानिक नागरिकांनी स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे बुजविले.सध्या या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर माेठ माेठे खड्डे पडल्याने चारचाकी वाहनेच काय, पण पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या शेतकरी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवाशांना माेठया गैरसाेयीला सामाेरे जावे लागत आहे. सध्या पाऊस सुरु असल्याने या रस्त्यावर प्रचंड चिखल झाला असून नागरिकांना चिखलातून वाट काढत जावे लागत आहे. अपघाताची शक्यता येथे निर्माण झाली आहे. अनेक लाेकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले, मात्र या रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही.पावसाने उघडीप दिल्यानंतर प्रशासनाने या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे, अन्यथा येथील रहिवाशांचे वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता राेकाे आंदाेलन करण्याचा इशारा दिलीपराव पवार यांचेसह येथील नागरिकांनी दिला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!