श्रीरामपूर प्रभाग रचनेत अनेकांना धक्का;पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांची होणार दमछाक

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषदेची प्रभाग रचना मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागांच्या नव्याने झालेल्या पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांना नवा प्रभाग...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषदेची प्रभाग रचना मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागांच्या नव्याने झालेल्या पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांना नवा प्रभाग शोधावा लागणार आहे तर काहींचा नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्यातच कस लागणार आहे.नवीन प्रभाग रचनेनुसार आता 34 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत.पूर्वी ही संख्या 31 इतकी होती.या नवीन प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.प्रत्येक प्रभागातून 2 नगरसेवक निवडुण दिले जाणार आहेत.२०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येक प्रभागाची बेस लोकसंख्या ५२५२ अशी गृहीत धरली गेली आहे. प्रभाग रचनेत रेल्वे लाईन व पाटपाण्याचे कालवे ही नैसर्गिक सीमा धरली गेली आहे. त्यामुळे काही इच्छुक नगरसेवकांना सुटसुटीत मतदारसंघ मिळाला असून, काहींना नव्याने प्रभाग शोधावा लागणार आहे.जुन्या माजी नगरसेवकांना विशेष अडचण नसली, तरी नव्या इच्छुकांकडून हरकती नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय निघते, त्यावर पुढील सर्वच राजकीय पक्षांची  गणिते ठरणार आहेत. प्रत्येक पक्षाला प्रत्येक प्रभागात उमेदवार देताना अडचणी येणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

आरक्षण कसे राहणार-
नगरसेवक संख्या-३४
अनुसूचित जातीसाठी जागा-६
अनुसूचित जमातीसाठी जागा-१
इतर मागासवर्गीय जागा-९
खुला गट-१८

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!