साई सच्चरित पारायण सेवा व श्रद्धेचा संगम: डॉ.सुजय विखे पाटील;पारायण सोहळ्यासाठी एक लाख रुपयांची देणगी

श्रीरामपूर-शिर्डी येथे सुरू असलेल्या साई सच्चरित पारायण सोहळ्याला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. १००० रूमजवळ भक्तिमय वातावरणात पारायणाचे भव्य...

श्रीरामपूर-
शिर्डी येथे सुरू असलेल्या साई सच्चरित पारायण सोहळ्याला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. १००० रूमजवळ भक्तिमय वातावरणात पारायणाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या पवित्र सोहळ्यात त्यांनी साई महाराजांचे प्रवचन करणाऱ्या पूज्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.या पारायण सोहळ्याचे आयोजन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, नाट्य रसिक मंच शिर्डी व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असून, “ही सामूहिक सेवा आणि श्रद्धेची एक सुंदर अभिव्यक्ती आहे,” असे मत डॉ. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त.डॉ. विखे पाटील यांनी भाविक भक्तांसमवेत भारतीय बैठक लावून प्रसाद ग्रहण करताना, या क्षणाला सेवा आणि श्रद्धेचा संगम असे सांगितले. यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने पारायण सोहळ्यासाठी एक लाख रुपयांची देणगी आयोजक समितीकडे सुपूर्त करण्यात आली.यावेळी डॉ. विखे पाटील यांनी ऑक्टोबर महिन्यात  शिर्डीत होणाऱ्या प्रदीप मिश्रा महाराज यांच्या आगामी कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर होईल, अशी माहिती देखील दिली. तसेच त्यांनी  आग्रहाने आवाहन केले की, या पावन कार्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या  स्वयंसेवकांनी आमच्याशी संपर्क साधावा.या पवित्र पारायण सोहळ्यात हजारो भाविकांनी भक्तिभावाने सहभाग दर्शविल्याने परिसर अतिशय भक्तिमय, ऊर्जा आणि एकात्मतेने भारलेला दिसत होता. श्री साई बाबांच्या चरणी मन मोकळं करणाऱ्या या सोहळ्याने प्रत्येकाच्या हृदयात अनमोल स्मृती आणि नवचैतन्य पसरवले. यावेळी अभय शेळके पाटील, भाजपा अध्यक्ष रवींद्र गोंदकर, ताराचंद कोते तसेच शिर्डी ग्रामस्थ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विखे पाटील परिवाराच्या वतीने पारायण सोहळ्यासाठी एक लाख रुपयांची देणगी आयोजक समितीकडे सुपूर्त करण्यात आली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!