भाजपा श्रीरामपूर तालुका-शहर कार्यकारणीच्या निवडी जाहीर;हापसे,आसने,मुरकुटे,कांगुणे,काळे यांच्या नियुक्त्या

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुका भाजपच्या बहुप्रतीक्षित तालुका व शहर कार्यकारणीच्या निवडी आज अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत.दोन्ही ठिकाणच्या निवडीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुका भाजपच्या बहुप्रतीक्षित तालुका व शहर कार्यकारणीच्या निवडी आज अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत.दोन्ही ठिकाणच्या निवडीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा. सभापती दीपक पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी श्रीरामपूर तालुका कार्यकारिणी जाहीर केली.कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, १० चिटणीस, १ कोषाध्यक्ष, ३० कार्यकारीणी सदस्य, २४ इतर आघाड्यांसह ६९ कायम निमंत्रीत सदस्य असे एकूण १५० जणांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर मंडलचीही कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून त्यात २ सरचिटणीस, ११ उपाध्यक्ष, ६ चिटणीस, कोषाध्यक्ष-१, ५४ कार्यकारीणी सदस्य तसेच कायम निमंत्रीत १५ सदस्यांसह ११७ जणांची कार्यकारीणी शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी जाहीर केली आहे.तालुका कार्यकारणीत अनेक छोट्या गावांसह माळवडगाव,घुमनदेव,कमालपूरलाही प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.यात तालुका उपाध्यक्षपदी मुकुंद हापसे,सरचिटणीसपदी भैरवनाथ कांगुणे, सचिवपदी रावसाहेब मुरकुटे, नारायण काळे,श्रीरामपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी संदीप आसने यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश भाजप सरचिटणीस विजयभाऊ चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व मा. सभापती दिपक पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झालेल्या तालुका व शहर भाजपाच्या कार्यकारीणीमध्ये कार्यकर्ते तसेच विविध स्तरातील मान्यवर यांचा यात समावेश आहे.सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटिल, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहर अध्यक्ष जितेंद्र छाजेड, माजी सभापती दिपक पटारे, जेष्ठ नेते गिरीधर आसने आदिनी अभिनंदन केले.

भैरवनाथ कांगुणे
रावसाहेब मुरकुटे
संदिप आसने
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!