अतिक्रमण काढले,आता पुनर्वसनाचे काय ?;आ. हेमंत ओगले यांचा सरकारला सवाल

श्रीरामपूर-ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही असा सवाल आमदार हेमंत ओगले यांनी सरकारला केला आहे.पावसाळी अधिवेशना दरम्यान...

श्रीरामपूर-
ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही असा सवाल आमदार हेमंत ओगले यांनी सरकारला केला आहे.पावसाळी अधिवेशना दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या चर्चेत आमदार हेमंत ओगले यांनी अनेक सवाल उपस्थित केले. मुंबईसारख्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसंच नावाखाली वीस – वीस वर्षापासून अनेक पुनर्वसनाचे प्रकल्प प्रलंबित आहे ग्रामीण महाराष्ट्रात देखील हीच अवस्था असून राज्य सरकार याबाबत उदासीन असल्याचे लक्षात येते. नुकत्याच झालेल्या अतिक्रमण कारवाईत माझ्या मतदारसंघांमधील अनेकांचे संसार उघड्यावर आले. एका कुटुंबात काही दिवसांची बाळंतीण ताई आपल्या छोट्या बाळाला घेऊन अतिक्रमणास विरोध करत होती परंतु या निर्दयी प्रशासनाने आपली कारवाई चालू ठेवली. गेल्या 30 ते 40 वर्षापासून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. सदरची कारवाई करून जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे परंतु संबंधितांच्या पुनर्वसनाचे कोणतेही स्पष्ट धोरण समोर आलेले नाही.अतिक्रमण बाधितांचे पुनर्वसनासाठी मी वेळोवेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन हा गंभीर विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला त्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेत तातडीने पुनर्वसन करणे आवश्यक आहे असे देखील आमदार हेमंत ओगले यांनी सभागृहात म्हटले.शेतकरी कर्जमाफी, पिक विमा बाबतच्या जाचकआटी, सोलर कृषी पंप यांसारख्या शेतकरी हिताच्या प्रश्नांवर देखील आमदार ओगले यांनी पावसाळी अधिवेशनात लक्ष केंद्रित केले आहे.

आ. हेमंत ओगले
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!