पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त आवर्तनाची मागणी करू;नगराध्यक्ष ससाणे यांच्याकडून पाणीपुरवठ्याचा आढावा
श्रीरामपूर-पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड चालणार नाही यामागे काय होते काय झाले यात पडायचे नाही श्रीरामपुरात पिण्याचे पाणी स्वच्छ व...
श्रीरामपूर- पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड चालणार नाही यामागे काय होते काय झाले यात पडायचे नाही श्रीरामपुरात पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक प्रमाणात नागरिकांना द्या अशा सूचना नवनिर्वाचित लोकनियुक्त अध्यक्ष करण ससाणे यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना दिले आहेत. आ.हेमंत ओगले यांच्या मार्फत आपण पिण्याच्या पाण्यासाठी अतिरिक्त आवर्तनाची मागणी करणार असल्याचे देखील ससाणे यांनी सांगितले. काल नगरपरिषदेने जाहीर केले की एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार त्या संदर्भात तातडीने नगराध्यक्ष ससाणे यांनी नगरसेवकांसह साठवण तलाव गाठत पाहणी केली आणि पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, बाबासाहेब दिघे, ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, राजेंद्र पवार सर, योगेश जाधव, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, लकी सेठी, सुभाष पोटे, दिपक वमने, बिट्टू कक्कड, निलेश नागले, संतोष परदेशी, रितेश एडके, अफरोज शहा, प्रवीण कोठावळे, अभिजित लिप्टे, सिद्धार्थ सोनवणे, सागर कुऱ्हाडे, भाग्येश लोखंडे, अतुल शेटे, नगरआभियंता अभिजित मराठे, निलेश बकाल उपस्थित होते. नगराध्यक्ष ससाणे म्हणाले की, श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष देणारा असून त्यामध्ये पाणी, आरोग्य, लाईट आणि बांधकाम या विभागांमध्ये तातडीनं बदल करणे आवश्यक आहे त्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ असे देखील ससाणे यांनी म्हटले आहे.नगराध्यक्ष ससाने हे लवकरच नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारणार असून त्या अगोदर त्यांनी साठवण तलावाची पाहणी करून पिण्याच्या पाण्याचा आढावा घेतला आहे.
नगराध्यक्ष करण ससाणे यांनी नगराध्यक्ष होताच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याबाबत पहिले पत्र देत मागणी केली. श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे, राजश्रीताई ससाणे यांच्या कार्यशैली प्रमाणेच करण ससाणे यांचे कामकाज राहिल,अशी अपेक्षा नागरिकांतुन व्यक्त केली जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी