जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मा.आ.आ.चंद्रशेखर घुले बिनविरोध;पालकमंत्री विखे पाटलांनी राजकिय समीकरण जुळवले

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या  अध्यक्षपदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ.चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड...

श्रीरामपूर-
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या  अध्यक्षपदासाठी आज सोमवारी (दि.24) घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार आ.चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली.

यापूर्वी सकाळी ९ वाजता अहिल्यानगरमधील राज पॅलेस येथे सर्व संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाली.या बैठकीत बँकेच्या अध्यक्षपदासाठी चंद्रशेखर घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यानंतर त्यांची बिनविरोध प्रकिया पार पडली.

या निवडीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे आहेत.काळे–विखे यांच्यातील सध्याचा असलेला राजकीय समन्वयदेखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा घटक ठरल्याचे मानले जात आहे.

चेअरमन निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजळे, , आण्णासाहेब म्हस्के , अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, मा. आ.भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे व शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे.
निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विखे पाटील यांना सहकार्य करणे आवश्यक असल्याने घुले यांना सर्वांनी समर्थन दिल्याचे स्पष्ट होत आहे.

बँकेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर मा.आ.चंद्रशेखर घुले यांनी आपल्यावर सर्व संचालकांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले. तसेच पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!