श्रीरामपुरात एका उमेदवाराच्या रॅलीत रोजंदारीवर ‘कार्यकर्ते’ ?; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओने चर्चा

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकीमुळे शहरात ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.शहरात कट्टयाकट्टयावर सध्या फक्त निवडणूकीची चर्चा रंगत आहे.त्यातच आता श्रीरामपुरात...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिका निवडणूकीमुळे शहरात ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.शहरात कट्टयाकट्टयावर सध्या फक्त निवडणूकीची चर्चा रंगत आहे.त्यातच आता श्रीरामपुरात निघालेल्या एका उमेदवाराच्या रॅलीमध्ये रोजंदारीवर ‘कार्यकर्ते’ आणल्याचा व्हिडीओ संबंधित उमेदवाराच्या विरोधकांकडून व्हायरल केला गेल्याने या व्हिडीओची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.त्याचे झाले असे की,श्रीरामपूर शहरात एका
उमेदवाराची भव्य दिव्य रॅली निघाली. या रॅलीची शहरात जोरदार चर्चा सुरू असतानाच सोशल मीडियावर या रॅलीबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात एक व्यक्ती आपल्याला रॅलीत येण्यासाठी २०० रूपये रोजंदारी दिल्याचे सांगत आहे. त्या व्हिडीओत संबंधित उमेदवाराचे नावही ही व्यक्ती घेत असून मध्यस्थाचेही नाव सदर व्यक्ती घेत आहे. एका जणाने ३०० रूपये देऊन ४०० लोकांना रॅलीत आणल्याचे हा व्यक्ती सांगत आहे. सदर व्हायरल व्हिडीओमधील व्यक्ती हा मद्यपी असल्याचेही दिसते. सदर रॅलीचा व्हिडीओ आणि त्याबरोबर या रोजंदारी दिल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता कुठे नगरपालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे.सुरवातीच्या टप्प्यातच इच्छुक उमेदवार आणि त्याच्या विरोधकांनी एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी असे हातखंडे वापरायला सुरुवात केल्याने निवडणूक येणाऱ्या काळात कुठल्या वळणावर जाईल,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!