आगीत गुदमरून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू;फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत क्षणार्धात होत्याचे नव्हते

श्रीरामपूर-नेवासा फाटा परिसरात कॉलेजजवळील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला.रविवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेने परिसरात...

श्रीरामपूर-
नेवासा फाटा परिसरात कॉलेजजवळील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला.
रविवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दुकानाच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या मयूर अरुण रासने (वय ३६) यांच्यासह त्यांची पत्नी पायल (३०), दोन लहान मुले अंश (११) व चैतन्य (६) आणि वयोवृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (८५) यांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मयूर यांचे वडील अरुण रासने व त्यांची पत्नी हे मालेगाव येथे नातलगांकडे गेले होते, त्यामुळे ते बचावले आहेत.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, गाद्या, व इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. स्थानिकांनी बचावकार्य सुरू करत अग्निशमन दलालाही कळवले तेही घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचा वेग इतका जबरदस्त होता की आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणे शक्य झाले नाही.या घटनेनंतर नेवासा फाटा परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने व्यावसायिक ठिकाणांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.परिसरातील व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाकडे दुकानांमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य करण्याची आणि नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, सखोल तपास सुरू केला आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.

दुर्दैवी रासने कुटुंब
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!