बेलापूरचा ‘तो’ भोंदू बाबा अखेर गजाआड;बलात्काराच्या गुन्ह्याची दिली कबुली

श्रीरामपूर-गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या बेलापूर बु ॥ परिसरातील गणेश माधवराव शिंदे नावाच्या भोंदू बाबाला आज सोमवार दि.27 रोजी श्रीरामपूर पोलीसांनी...

श्रीरामपूर-
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या बेलापूर बु ॥ परिसरातील गणेश माधवराव शिंदे नावाच्या भोंदू बाबाला आज सोमवार दि.27 रोजी श्रीरामपूर पोलीसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश शिंदे या भोंदू बाबाने बलात्कार केल्याची कबुली दिली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तराज भवर यांनी दिली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोंदू गणेश शिंदे याच्या विरोधात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार तसेच जादूटोणा विरोधी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर महिलेची या भोंदू बाबाने सुमारे 20 लाखाची फसवणूकही केली आहे.
नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात च्या गाजलेल्या महिला अत्याचारांच्या प्रकरणानंतर बेलापूर च्या या शिंदे नामक भोंदू बाबाच्या ‘लीला’  आता उजेडात आल्याने श्रीरामपूर सह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.नुकतीच काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील एका भोंदू बाबाला अटक झाल्या नंतर आता बेलापूरचा भोंदू बाबा पोलीसांच्या तावडीत सापडल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.
बेलापूरच्या ह्या बाबाचे भक्तांच्या फसवणुकीचे अनेक  प्रकार असून सर्व प्रकरणे पैसे देऊन तडजोडी करून  मिटवल्याची चर्चा आहे. बेलापूर च्या या भोंदू बाबाकडे अवैध मार्गाने मोठी संपत्ती जमा झाली असून भोंदूगिरीतूनच ती त्याने कमावल्याचा संशय आहे.आता पोलीस बेलापूरच्या ‘त्या’ भोंदू बाबाचे कोणते गैरप्रकार समोर आणतात हे चौकशी नंतर पुढे येईलच पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!