अट्रोसिटीच्या गुन्ह्यात गलांडे यांना न्यायालयाचा दिलासा;’तोपर्यंत’ दोषारोप निश्चित न करण्याचा आदेश

श्रीरामपूर–कोणताही ठोस पुरावा मिळालेला नसतानाही केवळ नजरचुकीने अट्रोसिटीच्या गुन्ह्याच्या दोषारोपपत्रात नाव समाविष्ट झालेल्या नानासाहेब काशिनाथ गलांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद...

श्रीरामपूर–
कोणताही ठोस पुरावा मिळालेला नसतानाही केवळ नजरचुकीने अट्रोसिटीच्या गुन्ह्याच्या दोषारोपपत्रात नाव समाविष्ट झालेल्या नानासाहेब काशिनाथ गलांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कनिष्ठ न्यायालयाने गलांडे यांच्याविरुद्ध कोणतीही कार्यवाही करू नये, किंवा दोषारोप निश्चित करू नये, असे आदेश न्यायमूर्ती अभय जे. मंत्री यांनी दिले आहेत.
याबाबत निकालपत्रात म्हटले आहे, की नानासाहेब गलांडे (आरोपी क्र. ७) यांच्या वतीने वकील आर. आर. कर्पे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तपासादरम्यान गलांडे यांच्याविरुद्ध कोणताही भक्कम पुरावा सापडलेला नाही, असे खुद्द तपास अधिकाऱ्यानेच कनिष्ठ न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले होते. नजरचुकीमुळे त्यांचे नाव दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आले असून, आरोपींच्या सूचीमधून त्यांचे नाव वगळण्यात यावे, अशी विनंतीही तपास अधिकाऱ्याने केली होती.सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एन. डी. राजे यांनी देखील या वस्तुस्थितीला विरोध दर्शवला नाही.गलांडे यांच्याविरुद्ध कोणताही भक्कम पुरावा मिळून आलेला नाही, हे त्यांनीही मान्य केले. कनिष्ठ न्यायालयात २९ एप्रिल २०२६ रोजी दोषारोप निश्चितीची प्रक्रिया होणार होती, त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने गलांडे यांना हे कायदेशीर संरक्षण दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जून, २०२६ रोजी होणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!