बंटी जहागीरदार हत्या प्रकरणी दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात;नाकाबंदीमुळे आरोपी तात्काळ जेरबंद

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील बंटी जहागीरदार यांची काल दि.31 रोजी दुपारी दोन जणांनी दुचाकीवरून येऊन गोळ्या घालून हत्या केली होती.या घटनेचचे चित्रीकरण परीसरातील...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरातील बंटी जहागीरदार यांची काल दि.31 रोजी दुपारी दोन जणांनी दुचाकीवरून येऊन गोळ्या घालून हत्या केली होती.या घटनेचचे चित्रीकरण परीसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये झाले होते. त्यात दिसणाऱ्या दोन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार करून काल रात्री उशिरा यातील दोन्ही आरोपिंना ताब्यात घेतले आहे.कुष्णा अरुण शिनगारे,वय 23 वर्ष,रा-सिध्दार्थनगर,वार्ड नं 1,श्रीरामपूर 2) रविंद्र गौतम निकाळजे,वय 20 वर्ष,रा-भिमनगर,वार्ड नं 6,श्रीरामपूर अशी या आरोपींची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बंटी उर्फ अस्लम जहागीरदार यांच्यावर गोळीबार झाल्याने त्यांना अहिल्यानगर येथे दवाखान्यात नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1/26 कलम 103,109,3(5) BNS तसेच आर्म ऍक्ट कलम 3(25) अन्वये 2 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. रात्री उशिरा यातील दोनही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आरोपींनी कोठून आणले?गुन्ह्यामध्ये अन्य कोण आरोपी सामील आहेत का?  या बाबींचा पोलीस सखोल तपास करत आहेत.दरम्यान घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर देखील पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर,पो.नि नितीन देशमुख हे पुढील तपास करीत आहे. बंटी जहागीरदार याच्यावर पुणे बॉम्बस्फोटसह १७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आज दुपारी बंटी जहागीरदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
       

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!