सराईत आरोपीला 6 मोबाईलसह ठोकल्या बेड्या;65 हजारांचे मोबाईल जप्त;शहर पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर-श्रीरामपुर शहर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे 65 हजार रुपये किंमतीचे 6 मोबाईल जप्त केले आहेत.निखिल नितीन आवारे,...

श्रीरामपूर-
श्रीरामपुर शहर पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे 65 हजार रुपये किंमतीचे 6 मोबाईल जप्त केले आहेत.निखिल नितीन आवारे, वय 21 वर्षे, रा.वॉर्ड नं. 01,श्रीरामपूर असे या सराईत चोरट्याचे नाव असून त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने अनेक मोबाईल चोऱ्या केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की,दि. 18/12/2025 रोजी फिर्यादी प्रकाश नारायण बोडखे हे त्यांचा मुलगा गौरव बोडखे याच्यासह गुजरात येथे कागदपत्र पडताळणी करता जाणार असल्याने श्रीरामपूर बस स्टॅण्ड येथे दुपारी 4 वा. सुमारास आले होते. बस स्टॅण्ड येथे नाशिक बसची वाट पाहत उभे होते. बस येण्यापुर्वी फिर्यादी व त्यांचा मुलगा बस स्टॅण्ड पाठीमागे असलेल्या सार्वजनिक शौचालयाकडे गेले.त्यावेळी 2 अनोळखी इसम हे अचानक त्यांच्या समोर आले व त्यांनी फिर्यादीच्या मुलाच्या हातातील 15,000/- रु.किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावुन घेवुन बस स्टॅण्डमागे असलेल्या झाडाझुडपामध्ये पळुन गेले.त्यानंतर बोडखे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 1087/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309 (4),3(5) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल केला.

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास तात्काळ सदर गुन्हयातील गेलेल्या मुद्देमालाचा व अनोळखी आरोपीतांचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली व बस स्टॅण्ड परिसरात असलेल्या लोकांकडे चौकशी केली असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि सदरचा गुन्हा हा आरोपी निखिल नितीन आवारे, वय 21 वर्षे, रा. गोंधवणी पुलाजवळ, वॉर्ड नं. 01, श्रीरामपूर याने त्याच्या एक साथीदार आरोपीसह मिळुन केला आहे. सदरचा आरोपी हा त्याच्या राहत्या घरी आला आहे. तपास पथकाने तात्काळ त्याच्या घरी जावुन शोध घेतला असता तो घरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन नमुद गुन्हयाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार आरोपी अरबाज ऊर्फ बाळया ऊर्फ बाज अब्बास शहा रा. संजयनगर श्रीरामपूर याच्यासह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातुन श्रीरामपूर बस स्टॅण्ड परिसरातुन चोरी केलेले 65 हजार रुपये किंतमीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेकॉ/प्रसाद साळवे, पोकों/ संभाजी खरात, पोकों/अमोल पडोळे, पोकों/सचिन दुकळे, पोकों/अजित पटारे, पोकों/रामेश्वर तारडे, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकॉ/सचिन काकडे, पोकॉ/ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक,रामचंद्र शिखरे हे करीत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!