माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा सन्मान-ना.विखे पाटील; ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ पुरस्काराने विखे पाटील यांचा सन्मान

श्रीरामपूर-लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या LOKMAT GLOBAL ECONOMIC CONVENTION या जागतिक परिषदेत ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा पुरस्कार देवून राज्याचे जलसंपदा मंत्री...

श्रीरामपूर-
लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या LOKMAT GLOBAL ECONOMIC CONVENTION   या जागतिक परिषदेत ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा पुरस्कार देवून राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते विखे पाटील यांनी मा. ना. शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत सपत्निक या पुरस्काराचा स्विकार केला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनिलजी, तटकरे अभिनेते श्री. सुनिल शेट्टी, लोकमत वृतपत्र समूहाचे अध्यक्ष श्री. विजयजी दर्डा, श्री. ऋषी दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सन्मानानंतर आपल्या भावना व्यक्त करताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री श्री. अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संधीमुळे राज्याच्या आणि अहिल्यानगरच्या विकासात्मक प्रक्रीयेत योगदान देता येत आहे. आजपर्यत केलेल्या कार्याचा आणि माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे.शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेनं मला सलग आठ वेळा विधानसभेत काम करण्यासाठी दिलेल्या पाठबळामुळे या सन्मानाची संधी मला मिळाली, त्यामुळे मिळालेला सन्मान त्यांना समर्पित करीत आहे,असेही ते शेवटी म्हणाले.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या शुभहस्ते
‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा पुरस्कार देवून राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी मा. ना. शालिनीताई विखे पाटील याही उपस्थित होत्या.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!