पत्रकाराला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी; पत्रकार संघटनांचा निषेध

श्रीरामपूर-श्रीरामपूरचे वरिष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकराव आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक...

श्रीरामपूर-
श्रीरामपूरचे वरिष्ठ पत्रकार व दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब शंकराव आगे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
बाळासाहेब आगे यांनी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या dainik_jay_baba_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व संबंधित एसडीपीओंचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या वृत्तात आरोपी गणेश मुंडे याचे नाव आले होते. त्यानंतर ganesh..mundhe_307  या ‘इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे वृत्त डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकीन’ अशा आशयाचा धमकीचा संदेश आला.
पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने पत्रकार समाजात संतापाची लाट उसळली आहे. गेली 40 वर्षांपासून श्रीरामपूरात अनेक पत्रकार राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी विषयांवर सडेतोड लिखाण करीत आहेत. मात्र आजवर कोणत्याही पत्रकाराला अशा प्रकारे धमकी मिळाली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्त प्रसारित केल्यानंतर धमक्या मिळत असतील, तर शहर पत्रकारितेसाठी कितपत सुरक्षित राहिले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर प्रेस क्लब, श्रीरामपूर पत्रकार संघ, श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघ, बेलापूर पत्रकार संघ आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेच्या प्रतिनिधींनी घटनेचा निषेध करून आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या बैठकीस प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, सचिव प्रकाश कुलथे, खजिनदार अनिल पांडे, उपाध्यक्ष करण नवले, विकास अंत्रे, सहसचिव महेश माळवे, राजेंद्र बोरसे, शिवाजी पवार, रवी भागवत, कामगार नेते नागेश सावंत, ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे,नितीन शेळके,
प्रदीप आहेर, उपाध्यक्ष सलीम खान पठाण, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असलम बिनसाद, बेलापूर पत्रकार संघाचे देविदास देसाई, दिलीप दायमा, सुहास शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. नितीन देशमुख यांना निवेदन देत  पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!