‘शौर्यपदक’विजेत्या देवेंद्र औताडेंचे श्रीरामपूरशी खास कनेक्शन;’ऑपरेशन सिंदूर’मध्ये निभावली महत्वपूर्ण भूमिका

श्रीरामपूर-पहलगाम मधील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या भारतीय सैन्य जवानांनी एकत्रित रित्या मोहीम राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. यात असंख्य अतिरेक्यांना...

श्रीरामपूर-
पहलगाम मधील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या भारतीय सैन्य जवानांनी एकत्रित रित्या मोहीम राबवून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. यात असंख्य अतिरेक्यांना यमसदनी पाठवण्याचे अतुलनीय शौर्य आपल्या सैन्याने दाखवले. अत्यंत जोखमीच्या या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ संबोधले गेले.याच ऑपरेशन सिंदूरमध्ये श्रीरामपूरचे भुमीपूत्र पायलट देवेंद्र बाबासाहेब औताडे यांना वायूसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले आहे.अनेकांनी याबद्दल कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.फायटर पायलट असलेले देवेंद्र औताडे हे गणेश कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब दगडू औताडे यांचे चिरंजीव असून शेतकरी संघटनेचे सुदाम औताडे यांचे ते पुतणे आहेत.ऑपरेशन सिंदूरमध्ये हवाई दलाचे फायटर पायलट म्हणून उच्च जोखमीच्या मोहिमेत देवेंद्र औताडे यांनी जे अपार शौर्य दाखवले त्यासाठी त्यांना हे शौर्यपदक देण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या देवेंद्र औताडे यांनी जे शौर्य दाखवले,  त्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्हयातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

पायलट देवेंद्र औताडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!