अंध विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद;अशोक स्कूलचे अंध शाळेत रक्षाबंधन

श्रीरामपूर-अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व अशोक ग्रुप ऑफ स्कूलच्या को-ओर्डीनेटर सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक इंग्लिश...

श्रीरामपूर-
अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व अशोक ग्रुप ऑफ स्कूलच्या को-ओर्डीनेटर सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक इंग्लिश मेडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यार्थिनी व शिक्षिका मधुरा कुंदे, नितु गायकवाड, भाग्यश्री पागिरे व ड्राइवर अण्णासाहेब राऊत, हेल्पर ऋत्विक लोखंडे यांनी अंध शाळेतील विद्यार्थ्यांना रक्षाबंधन करण्यासाठी भेट दिली.
याप्रसंगी अंध शाळेतील मुलांनी सुंदर स्वागत गीत सादर करून सर्वांचे स्वागत केले. नितु गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून, अंध मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा व प्रेम भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. मधुरा कुंदे यांनी मुख्याध्यापिका वीणा आंबेडकर यांचा सत्कार केला. त्यानंतर स्कूलची विद्यार्थिनी वेदिका बुऱ्हाडे हिने रक्षाबंधनाचे महत्व सांगून अंध मुलांची शाळा व सुविधा पाहून प्रभावीत झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलांना राख्या बांधून लाडू वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका आंबेडकर यांनी माजी आ.श्री.मुरकुटे यांचे या शाळेला विशेष सहकार्य लाभत असून त्यांच्या शाळेचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आसल्याचे सांगितले. त्यांनी स्कूलच्या समन्वयिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, प्राचार्य संपत देसाई यांचेही आभार मानले. शेवटी अशोकची विद्यार्थिनी पूर्वा बोरावके हिने उपस्थितांचे आभार मानले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!