श्रीरामपूर येथील शिवाजी रोडवरील जैन स्थानकमध्ये 10 जुलैपासून दिवाकर संप्रदायाच्या साध्वीजींचा चातुर्मास सुरू होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे.
श्रीरामपूर (वार्ताहर):
दिवाकर संप्रदायाच्या उपप्रवर्तिनी डॉ. पू. श्री सत्यसाधनाजी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 साध्वीजींचा चातुर्मास श्रीरामपूर येथे होणार आहे. यामध्ये पू. अर्हतज्योतिजी, पू. तन्मयदर्शनाजी, पू. हितसाधनाजी, पू. हर्षप्रज्ञाजी, पू. गुरूछायाजी आणि पू. सौम्यज्योतीजी यांचा समावेश आहे.
पायी विहार आणि नगर प्रवेश:
साध्वीजींचे सध्या वास्तव्य बेलापूर गावात आहे.
30 जून रोजी सकाळी 6.30 वा. साध्वीजी पायी विहार करून श्रीरामपूर शहरात प्रवेश करतील.
सकल जैन समाज व भाविकांनी के. के. मोटर्स (श्रीरामपूर-बेलापूर रोड) येथे उपस्थित राहून स्वागत करावे, असे आवाहन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश लोढा व विश्वस्तांनी केले आहे.
तात्पुरते वास्तव्य आणि प्रवचनाचे स्थळ:
- 30 जून ते 1 जुलै:
निवास – नितीन तेजपाल पिपाडा यांचे केतकी अपार्टमेंट, फेज 1, वॉर्ड नं. 7 - 2 व 3 जुलै:
निवास – संजय छाजेड यांचे घर, सरस्वती कॉलनी जवळ, वॉर्ड नं. 7
जैन समाज भाविकांना दोन्ही ठिकाणी दर्शन व प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
4 जुलै: स्थानकमध्ये प्रवेश सोहळा
4 जुलै रोजी सकाळी साध्वीजी छाजेड यांच्या निवासस्थानावरून पायी विहार करून जैन स्थानकमध्ये प्रवेश करतील.
या प्रवेश व स्वागत सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्थानकवासी जैन संघाने केले आहे.
आयोजकांकडून आवाहन:
“शहरातील सर्व जैन बांधवांनी साध्वीजींच्या चातुर्मास कार्यक्रमात सहभागी होऊन अध्यात्मिक लाभ घ्यावा,”
असे आवाहन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश लोढा, नितीन पिपाडा व संजय छाजेड यांनी केले आहे.
Author Name : ✍️ नितिन शेळके प्रतिनिधी – श्रीरामपूर लाईव्ह